Edible Oil Import Agrowon
ॲग्रोमनी

Edible Oil Import : सरकारने रिफाईंड सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी का केले?

Soybean Oil Update : केंद्र सरकारने बुधवारी रिफाईंड सोयाबीन आणि रिफाईंड सूर्यफुल तेल आयात शुल्कात कपात केली. मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे देशात कच्चे सोयाबीन, सूर्यफुल तेलाची आयात वाढली होती.

Anil Jadhao 

Soybean Update : केंद्र सरकारने बुधवारी रिफाईंड सोयाबीन आणि रिफाईंड सूर्यफुल तेल आयात शुल्कात कपात केली. मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे देशात कच्चे सोयाबीन, सूर्यफुल तेलाची आयात वाढली होती.

पण रिफाईंड तेलाची आयात कमी झाली. रिफाईंड तेलाची आयात वाढावी आणि देशातील भाव कमी व्हावे यासाठी सरकारने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील आयातशुल्क कमी केले. पण याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

देशात खाद्यतेलाचे साठे वाढल्याने तेल कमी दरात मिळूनही आयात कमी होत होती. त्यामुळे सरकारने खाद्येतल आयातशुल्कात वाढ करावी, अशी मागणी केली जात होती. शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादारांनी आयातशुल्काची मागणी केली. देशात खाद्यतेल स्वस्त झाल्याने सरकार आयातशुल्कात वाढ करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

पण बुधवारी सरकारने सर्वांनाच धक्का दिला. सरकारने रिफाईंड सोयाबीन आणि रिफाईंड सूर्यफुल तेल आयातशुल्कात ५ टक्क्यांची कपात केली. १७.५० टक्क्यांवरून आयातशुल्क १२.५० टक्क्यांपर्यंत कमी केले. आता १३.७५ टक्के आयातशुल्क लागणार आहे.

देशात सध्या रिफाईंड तेलाची आयात जास्त होताना दिसत नाही. तसेच आयातशुल्क कमी केले तरी आयात परवडणारी नाही. कारण कच्च्या तेलाचे भाव खूपच कमी झाले आहेत. असे आयातदारांच्या वतीने सांगण्यात आले. पण सध्या कच्च्या तेलाचे भाव पडले आहेत. त्यामुळे आयातशुल्कात कपात केली तरी रिफाईंड तेलाची आयात वाढण्याची शक्यता कमीच आहे.

तसेच याचा खाद्यतेल बाजारावर परिणाम होण्याची शक्यता नाही. काही काळ मानसिक परिणाम दिसू शकतो. पण दीर्घकाळ रिफाईंड खाद्यतेल आयातशुल्क कपातीने दर कमी होणार नाहीत, असे जाणकारांनी सांगितले.

रिफाईंड तेलाची आयात

चालू हंगामात पहिल्या सात महिन्यांमध्ये देशात ११.८६ लाख टन रिफाईंड तेलाची आयात झाली. एकूण आयातीत रिफाईंड तेलाचा वाटा १३ टक्के होता. तर गेल्या हंगामात हाच वाटा १४ टक्के होता. पण डिसेंबर २०२२ नंतर कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यानंतर देशात रिफाईंड तेलाची आयात कमी होत गेली. एप्रिल आणि मे महिन्यातील आयात सर्वात कमी झाली.

मे महिन्यात तर निचांकी ८५ हजार टनांची आयात झाली. रिफाईंड तेलाची आयात कमी होत असल्यामुळेच सरकारने रिफाईंड तेलाच्या आयातशुल्कात वाढ केल्याचे जाणकारांनी सांगितले.

महिनानिहाय रिफाईंड तेलाची आयात (लाख टनांत)

महिना…आयात

नोव्हेंबर…२.०२

डिसेंबर…२.५६

जानेवारी…१.७३

फेब्रुवारी…१.८७

मार्च…१.६९

एप्रिल…१.१२

मे…०.८५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT