Cotton Rate Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Rate : कापूस बाजाराची स्थिती काय?

दिवसभरात कापूस दरात चढउतार होत आहेत. मात्र देशातील बाजारात कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

अनिल जाधव

अनिल जाधव
पुणेः आंतराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या दरात (Cotton Rate) आज काहीशी वाढ झाली होती. मात्र कापूस बाजारावरील (Cotton Market) दबाव अद्यापही कायम आहे. दिवसभरात कापूस दरात चढउतार होत आहेत. मात्र देशातील बाजारात कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात कापूस दरात आज काहीशी दिलासादायक स्थिती होती. कापसाच्या दरात मागील पाच ते सहा दिवसांपासून चढ-उतार सुरु होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे नरमले. मात्र कालच्या तुलनेत दरात आज वाढ पाहायला मिळाली. आज कापसाचे वायदे ८२.१८ सेंट प्रतिपाऊंडने पार पडले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरावर चीनमधील कोरोना स्थिती, वाढती महागाई आणि इंधनाचे वाढलेले दर याचा परिणाम होत आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोना निर्बंध कडक होत आहेत. याचा परिणाम चीनच्या कापूस मागणीवर होण्याच्या भीतीने दर तुटले होते. ते आता काहीसे उभारी घेत आहेत.

देशातील बाजारात आज कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारात कापसाचे दर मागील सहा दिवसांमध्ये सरासरी ५०० रुपयाने नरमले होते. तर आज अनेक बाजारांमध्ये कापूस दर क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी सुधारले होते. तर कमाल दरातही काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. तर बहुतांशी बाजारात कापसाचे दर आजही सरासरीच्या जवळपास होते. मात्र देशातील कापूस बाजारात आज सकारात्मक वातावरण होते, असे कापूस व्यापाऱ्यांनी सांगितले.

………..
आजची दरपातळी
आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ३०० ते ८ हजार ८०० रुपये दर मिळाला. मात्र कमाल दराने आजही ९ दराचा टप्पा पार केला नाही. गुजरात आणि तेलंगणात काही ठिकाणी कापसाला कमाल ९ हजार ३०० रुपयांचा दर मिळाला. मात्र राज्यात कमाल दर अपेक्षेप्रमाणं वाढले नाहीत.

……………
कापूस दर सुधारणार का?
सध्या कापसाच्या दरात चढउतार सुरु आहेत. कापूस दरातील ही स्थिती पुढील महिनाभर राहण्याचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांनी कापूस विक्री टप्प्याटप्प्याने केल्यास बाजारातील आवक मर्यादीत राहील. त्यामुळं दर जास्त तुटणार नाहीत. असं झाल्यास जानेवारीपासून कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT