Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : अमेरिकेचे सोयाबीन गाळप फेब्रुवारीत घटले

नॅशनल ऑईल सीड्स प्रोसेसर्स असोसिएशन अर्थात नोपा ही अमेरिकेतील सोयाबीन गाळप करणारी संघटना आहे.

Team Agrowon

Soybean Price : अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) यंदा काहिसे वाढले. त्यातच सोयातेल आणि सोयापेंडला (Soyameal) उठाव असल्याने मागणी आहे.

त्यामुळे अमेरिकेत यंदा सोयाबीन गाळप वाढले. मात्र फेब्रुवारीतील गाळप घटले आहे, असा अंदाज नॅशनल ऑईल सीड्स प्रोसेसर्स असोसिएशन अर्थात नोपाने व्यक्त केला.

नॅशनल ऑईल सीड्स प्रोसेसर्स असोसिएशन अर्थात नोपा ही अमेरिकेतील सोयाबीन गाळप करणारी संघटना आहे. जगात सोयाबीन उत्पादनात अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. तर सोयाबीन गाळपातही अर्जेंटीनानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नॅशनल ऑईल सीड्स प्रोसेसर्स असोसिएशनचे सदस्य प्रक्रियादार अमेरिकेत होणाऱ्या एकूण गाळपापैकी तब्बल ९५ टक्क्यांचे गाळपर करतात. त्यामुळे नॅशनल ऑईल सीड्स प्रोसेसर्स असोसिएशनच्या अहवालाला महत्व असते.

अमेरिकेतील सोयाबीन गाळप फेब्रुवारी महिन्यात घटले आहे. फेब्रुवारीत अमेरिकेचे सोयाबीन गाळप १६५ दशलक्ष टन बुशेल्सवर पोचले. एक बुशेल्स म्हणजेच २७.५१ किलो सोयाबीन असते.

फेब्रुवारीतील सोयाबीन गाळपप उद्योगांच्या अपेक्षेपेक्षा कमीच राहीले. मात्र मागील वर्षीतील फेब्रुवारीच्या तुलनेत काहीसे अधिक होते, असेही नोपाने म्हटले आहे.

सध्या अमेरिकेच्या सोयाबीन तेल आणि सोयापेंडला चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन गाळप वाढलेले दिसते. उद्योगांनी फेब्रुवारी महिन्यात १६६ दशलक्ष टन बुशेल्स सोयाबीन गाळपाचा अंदाज व्यक्त केला होता.

मागीलवर्षी फेब्रुवारी महिन्यात १६५ दशलक्ष बुशेल्सचे गाळप झाले होते. तर जानेवारीत १६५ दशलक्ष टनांचे गाळप झाले होते.

अमेरिकेच्या नॅशनल ऑईल सीड्स प्रोसेसर्स असोसिएशनच्या सदस्यांनी फेब्रुवारीत ४ लाख टन सोयाबीन तेलाचा पुरवठा केला. जानेवारीच्या तुलनेत हा पुरवठा काहीसा कमी होता.

पण मागीलवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत जास्त होता. तसेच अमेरिकेतील सोयाबीन तेलाचा साठाही उद्योगांच्या उद्दीष्टापेक्षा कमीच झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT