Turmeric Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Turmeric Rate : हळद दरात सुधारणा; नांदेड बाजार समितीत कमाल ९१०० रुपये

Nanded Agriculture Produce Market Committee : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नवा मोंढा बाजारात सध्या हळदीच्या दरात सुधारणा झाली आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत नवा मोंढा बाजारात सध्या हळदीच्या दरात सुधारणा झाली आहे. बुधवारी (ता. २८) बाजारात साडेचार हजार क्विंटल आवक झाली.

यास किमान ६००० ते कमाल ९१००, तर सरासरी ७१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नांदेडसह शेजारील हिंगोली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र मागील काही वर्षांपासून वाढले आहे. यामुळे नांदेड बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात शेतीमालात सर्वाधिक हळदीची आवक होते. या ठिकाणी हळद खरेदीसाठी परराज्यांतील खरेदीदार येतात.

यामुळे नांदेडसह वसमत बाजारात हळदीला बाजारभाव बरा मिळतो. दोन महिन्यांपूर्वी हळदीच्या दरात घसरण झाली होती. या काळात सरासरी दर पाच हजारांपर्यंत खाली आला होता. परंतु सध्या मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे.

पंधरा दिवसांपासून आवकही वाढली आहे. बुधवारी (ता. २८) नवा मोंढा बाजारात साडेचार हजार क्विंटल आवक झाली. यास किमान ६००० ते कमाल ९१०० तर सरासरी दर ७१०० रुपये प्रतिक्विंटल मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

दर सुधारल्याने आवकही वाढल्याची माहिती मिळाली. तसेच सोयाबीनला सरासरी दर ४८७०, भुईमूग ७१००, हरभरा ४६५०, ज्वारी २५००, गहू २२०० रुपये प्रमाणे दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT