Tur Rate Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market Rate : तुरीच्या भावात २०० रुपयांपर्यंत चढ उतार

Aajcha Bajarbhav : तुरीच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशभरातील बाजारात तुरीच्या भावात ही स्थिती दिसत आहे. तुरीसोबतच तूर डाळीचे भावही काहीसे कमी जास्त होताना दिसत आहे.

Team Agrowon

Tur Bajarbhav : देशातील महत्वाच्या बाजारात सध्या नफावसुलीसाठी तुरीची विक्री होत आहे. त्यामुळे या बाजारांमध्ये तुरीची आवक वाढलेली दिसते. देशातील अनेक भागांमध्ये लागवडीही सुरु झाल्या. याचाही परिणाम बाजारावर दिसत असून दरात क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत चढ उतार सुरु आहेत.

पण तुरीचे सरासरी भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांवर टिकून आहेत, असे जाणकारांनी सांगितले.

तुरीच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशभरातील बाजारात तुरीच्या भावात ही स्थिती दिसत आहे. तुरीसोबतच तूर डाळीचे भावही काहीसे कमी जास्त होताना दिसत आहे. पण ग्राहक बाजारातील तूर डाळीचे भाव सध्या १३० ते १४० रुपयांच्या दरम्यान आहेत.

तर काही बाजारांध्ये भाव १५० रुपयांवरही दिसतात. तुरीचा कमाल भाव मागील महिनाभर १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. यामुळे या भावात नफावसुलीसाठी विक्री होत आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात ७ ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान खरेदी झालेली तूर सध्या बाजारात येत असल्याचं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. परिणामी भावात २०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसत आहेत.

बाजार नफावसुलीसाठी विक्री होत असल्याने आयात तुरीच्या भावावरही परिणाम दिसत आहे. म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीच्या भावातही क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची नरमाई दिसून येत आहे.

म्यानमारमधून आयात होणारी तूर सध्या ९ हजार ५०० ते १० हजार रुपयांनी मिळत आहे. नफावसुलीसाठी विक्री होत असल्याने बाजारात मागील आठवडाभरात तुरीची उपलब्धताही काहीशी वाढलेली दिसते. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे.

खरिपातील लागवडीची गतीही मागील चार दिवसांपासून वाढली. देशातील महत्वाच्या तूर उत्पादक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला. यामुळे लागवडीला गती आली.

नेमकी लागवड वाढते की घटते हे पेरणी संपल्यानंतरच कळेल. पण बाजारावर याचा मानसिक परिणाम जाणवत आहे.

पण तुरीच्या भावात जास्त नरमाई येण्याची शक्यता नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. तर तुरीच्या डाळीने बहुतेक बाजारांमध्ये आता १४० रुपयांच्या पुढेल गेल्या आहेत.

सरकार तूर डाळीच्या भावावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी स्थिर आहे. पण बाजारात पुरवठा वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुरीचे बाजारभाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT