Soybean Sunflower Market  Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Sunflower Market : सूर्यफुल तेलात घसरण, सोयातेलापेक्षा झाले स्वस्त

Edible Oil Rate : जगातील सर्वात मोठा सूर्यफुल तेल उत्पादक असलेल्या युक्रेनने तेलाचा पुरवठा वाढवला. युक्रेनला तेलाचा स्टाॅक कमी करायचा असल्याने कमी भावात तेल आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवले. यामुळे आयातदार भारतातही सूर्यफुल तेलाचे भाव कमी झाले.

Team Agrowon

Oil Rate Update : जगातील सर्वात मोठा सूर्यफुल तेल उत्पादक असलेल्या युक्रेनने तेलाचा पुरवठा वाढवला. युक्रेनला तेलाचा स्टाॅक कमी करायचा असल्याने कमी भावात तेल आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवले. यामुळे आयातदार भारतातही सूर्यफुल तेलाचे भाव कमी झाले.

देशात सध्या सोयाबीन तेलापेक्षा सूर्यफुल तेलाचे भाव कमी झाले आहेत, असे महत्वाच्या तेल विक्रेत्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशातील महत्वाच्या खाद्यतेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या खाद्यतेलाचा पुरवठा पुरेसा आहे. अदानी विलमार, जेमिनी आणि तिरुपती या तेल विक्रेत्या कंपन्यांच्या मते देशात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले.

सूर्यफुल तेलाचे भाव सर्वाधिक कमी झाल्याचे या कंपन्यांनी सांगितले. सध्या सोयाबीन तेलापेक्षा सूर्यफुल तेल १० टक्क्यांनी स्वस्त आहे. युक्रेनने कमी भावात सूर्यफुल तेल निर्यात केल्याने भारतीय बाजारात भाव कमी झाले.

तेलासोबतच युक्रेनेन आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा पुरवठाही वाढवला. याचा जागतिक बाजारातील गहू दरावर परिणाम झाला. देशातील बाजारातही गव्हाचे भाव कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारतात मागील दोन महिन्यांमध्ये गव्हाचे भाव १० ते ११ टक्क्यांनी वाढले आहेत. तांदळाच्या भावातही १५ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये यंदा रबी भाताला फटका बसला. त्याचा परिणाम सध्या दरावर दिसून येत आहे.

बिझनेसलाईनला अदानी मिलमारचे कार्यकारी संचालक अंगशु मल्लिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सूर्यफुल तेलाचे किरकोळ विक्रीचे भाव ११० ते १२० रुपये प्रतिलिटर आहेत. तर सोयाबीनचे भाव १३० रुपयांवर आहेत. युक्रेन सूर्यफुल तेलाचा साठा बाहेर आणत आहे. भारतात तेलाला मागणी असूनही पुरवठा वाढल्याने दरात नरमाई दिसून आली.

भारत दरवर्षी २० ते २५ लाख टन सूर्यफुल तेलाची आयात करतो. यापैकी जास्त आयात युक्रेनमधून होते. जेमिनीचे कार्यकारी संचालक प्रदीप चौधरी म्हणाले की, देशात सर्वच खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत. त्यामुले तेलाला मागणी चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्येतलाचा पुरवठा चांगला असल्याने उपलब्धतेची चिंता नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT