Agriculture Business Agrowon
ॲग्रोमनी

युवा कृषी उद्योजकांना वित्तपुरवठा करा; व्यंकय्या नायडू

कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासाचे प्रमाण वाढवावे लागेल. सध्या हे प्रमाण नगण्य आहे. या युवा पदवीधरांनी सुरुवातीला शेतकऱ्यांचे नेहमीचे प्रश्न लक्षात घ्यायला हवेत. शेती आणि शेतकऱ्यांना सध्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्या निराकारणाचे प्रयत्न करायला हवेत.

Team Agrowon

वित्तीय संस्था आणि बँकांनी कृषी क्षेत्रातील युवा उद्योजकांना वित्त पुरवठा करावा, असे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu) यांनी केले आहे.
नॅशनल ॲकाडमी ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंटच्या (NAARM) पदवीप्रदान समारंभात शनिवारी (दिनांक १४ मे) नायडू बोलत होते. कृषी व्यवसाय व्यवस्थापन (Agri Business Management) विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर मार्ग काढावेत, असे आवाहन केले.

कृषी क्षेत्रासमोर सध्या हवामान बदल, मातीचे बिघडलेला पोत, किडीचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे कृषी संशोधक आणि धोरणकर्त्यांना हवामान बदलाशी जुळवून घेत कृषी क्षेत्राचा विकास करावा लागणार आहे.

कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासाचे प्रमाण वाढवावे लागेल. सध्या हे प्रमाण नगण्य आहे. या युवा पदवीधरांनी सुरुवातीला शेतकऱ्यांचे नेहमीचे प्रश्न लक्षात घ्यायला हवेत. शेती आणि शेतकऱ्यांना सध्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्या निराकारणाचे प्रयत्न करायला हवेत, असा सल्लाही नायडू यांनी कृषी व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधरांना दिला आहे.

कृषी मालाच्या किमतीमध्ये तफावत असते, मात्र ही माहिती नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. कृषी मालाच्या विविध बाजापेठांमधील किंमतींची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकेल, असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला आहे.

२००९ ते २०२२ पर्यंत या संस्थेतून १२ बॅच (एकूण ३३४ विद्यार्थी) कृषी व्यवसाय व्यवस्थापनातील आपला अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडल्या असल्याचे यावेळी नॅशनल ॲकाडमी ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंटचे (NAARM) संचालक श्रीनिवास राव म्हणाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT