ॲग्रोमनी

Egg Export : श्रीलंका भारताकडून रोज दहा लाख अंडी आयात करणार

Team Agrowon

Egg Production : श्रीलंका अजूनही आर्थिक संकटातून जात आहे. पण श्रीलंकेत अंड्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे श्रीलंका भारतातून रोज दहा लाख अंडी आयात करणार आहे, असे श्रीलंकेतील आयातदार संस्थेने सांगितले.

श्रीलंका मागील दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई भासत असून अनेक देशांकडून मदत मागितली जात आहे. येथील पोल्ट्री व्यवसायावरही या सर्व घटनांचा मोठा परिणाम झाला.

परिणामी येथील अंडी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र दुसरीकडे श्रीलंकेतील अंडी मागणी वाढली. त्यामुळे श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात आयात करावी लागणार आहे.

श्रीलंका स्टेट ट्रेडिंग काॅर्पोरेशनचे अध्यक्ष असिरी वालीसुंदरा यांनी सांगितले की, भारतातून २ कोटी अंडी आयात केली जाणार आहे. त्यापैकी एक कोटी अंडी बाजारात आली आहेत. रोज १० लाख अंडी आयात केली जाणार आहे. ही खरेदी दोन पोल्ट्री फार्म्समधून होणार होती.

पण पशुधन उत्पादन विभागाने आणखी तीन फार्म्सचा समावेश केला. या पाच फार्म्समधून रोज १० लाख अंडी आयात होणार आहे.

श्रीलंकेत सध्या अंड्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली. याचा फटका सर्वसामान्य ग्राहक आणि उद्योगांना बसत आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आयातीतून पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे.

आयात अंडी बेकरी, बिस्कीट, मॅन्यूफॅक्चरींग, केटरींग सेवा आणि रेस्टाॅरंट्सना देण्यात येणार आहे. त्यासाठी ३५ श्रीलंकन रुपये प्रतिनग किंमत असेल, असेही वालीसुंदरा यांनी सांगितले.

श्रीलंकेतील वाढती मागणी लक्षात घेऊन भारतातून अंडी आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोज १० लाख अंडी आयात केली जाणार आहे. सध्या २ कोटी अंडी आयात होईल. पण पुढील काळात मागणी लक्षात घेऊन आयात वाढविण्याचा विचार केला जाईल.
असिरी वालीसुंदरा, अध्यक्ष, श्रीलंका स्टेट ट्रेडिंग काॅर्पोरेशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT