Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनसोबतच सोयातेल आणि सोयापेंडेच्या दरातही वाढ झाली. त्यामुळे देशातही सोयाबीनचे दर काहीसे वाढले होते.

टीम ॲग्रोवन

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनसोबतच सोयातेल (Soya Oil) आणि सोयापेंडेच्या (Soyapend) दरातही वाढ झाली. त्यामुळे देशातही सोयाबीनचे दर काहीसे वाढले होते. पण सोयाबीनच्या दरात नेमकी किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

कापसाचे दर दबावातच

देशातील बाजारात कापसाचे दर सध्या दबावात आहेत. देशात कापसाला सध्या ६ हजार ते ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर राज्यात कापूस ७ हजार ते ८ हजार ३०० रुपयाने विकला जातोय. सध्या कापसाला उठाव नसल्याचे सांगितले जाते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावात आहे. त्याचा परिणाम देशातील दरावर दिसतोय. मात्र पुढील महिना-दोन महिन्यात कापसाला सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

उडदाचे दर तेजीत

देशातील बाजारात सध्या उडदाचे दर तेजीत आहेत. देशात उडदाचा पुरवठा कमी आहे. मात्र मागणी टिकून आहे. मागील आठवड्यात उडीद डाळीला मागणी स्थिर होती. तसेच दरातही फारसा बदल झाला नाही. त्यामुळे सध्या उडदाला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही दिवस उडदाचे हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

यंदा विक्रमी साखर उत्पादनाचा अंदाज

देशातील ऊस गाळप हंगाम सुरु झालाय. चालू हंगामात देशभरात विक्रमी ३ हजार ६०० लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे. तर यंदा ऊस गाळपातून ४१० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. तर सुमारे ५० लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी होईल. देशातील साखरेचा वापर २७० लाख टनांवर पोचेल. चालू हंगामात देशातून ८५ लाख टन साखर निर्यातीची अपेक्षा आहे. तसेच यंदा मागील हंगामातील ५५ लाख टन साखर शिल्लक आहे. तर चालू हंगामाच्या शेवटी ६० लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केलाय.

टोमॅटोचे दर नरमले

राज्यात टोमॅटोच्या दरात काहीशी नरमाई दिसून येत आहे. टोमॅटोचे दर मागील महिन्यात तेजीत होते. मात्र सध्या बाजारातील आवक काहीशी वाढलेली दिसते. तसेच पुढील काही दिवसांमध्ये नव्या मालाची आवक सुरु होऊ शकते. त्यामुळे दरावर दबाव येत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या राज्यातील बाजारात टोमॅटोला प्रतिक्विंटल ११०० ते २ हजार रुपये दर मिळतोय. हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

सोयाबीन दर काहीसे वाढले ?

आंतरराष्ट्रीय बाजारात आज पुन्हा सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. तर देशातही सोयाबीनच्या किमान दरात १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. सीबाॅटवर आज सोयाबीनच्या वायद्यांनी मागील दीड महिन्यातील उच्चांक गाठला. सोयाबीनचे वायदे १४.३२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. रशियाने युक्रेनमधील निर्यात पुन्हा रोखली. त्यामुळे सूर्यफुल तेलाचा पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यातच पामतेलाच्या दरातही सुधारणा झाली.

बुर्सा मेलशिया एक्सचेंजवर कच्या पामतेलाचे वायदे १७२ रिंगीटने वाढून ४ हजार २९८ रिंगीटवर पोचले होते. त्यामुळे सोयाबीनच्या वायद्यात सुधारणा झाली आहे. सोयाबीनसोबतच सोयातेल आणि सोयापेंडेचेही दर वाढले. त्यामुळे देशातील सोयाबीनचे किमान दरही काहीसे वाढले. देशातील बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. मात्र किमान दर ४ हजार ६०० रुपयांवरून ४ हजार ७०० रुपयांपर्यंत पोचला.

आज सोयाबीनला देशभरात ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपये दर मिळाला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये याच दरम्यान सोयाबीनला दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा देशातील दर अद्यापही जास्त आहेत. त्यामुळे दरातील वाढ काहीशी कमी आहे, असं जाणकारांनी सांगितलं. तर पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील दर सुधारल्यास देशातील बाजारालाही आधार मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदाच सोयाबीन न विकता टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT