Soybean Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयाबीनला मिळतोय सोयापेंड दराचा आधार

सोयापेंडला चांगला उठाव राहून दर तेजीत असल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने म्हटले आहे. सोयापेंडचे दर तेजीत असल्याने सोयाबीन दराला आधार मिळत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Anil Jadhao 

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खाद्यतेलाचे दर (International Market Edible oil Rate) कमी झाले आहेत. मात्र अर्जंटीनातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज असल्याने सोयातेलाला आधार मिळू शकतो. तसेच तेलबिया पेंडेचे उत्पादन कमी राहील.

सोयापेंडला (Soyameal Rate) चांगला उठाव राहून दर तेजीत असल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने (Agricultural Department) अर्थात युएसडीएने (USD) म्हटले आहे. सोयापेंडचे दर तेजीत असल्याने सोयाबीन दराला (Soybean Rate) आधार मिळत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर (Palm oil Rate) कमी झाले आहेत. जगातील सर्वात मोठा पामतेल उत्पादक इंडोनेशिया पामतेलाचे दर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. इंडोनेशियाने जैव इंधनात पामतेलाचा वापर वाढवला.

तर निर्यात कोट्यातही बदल केला. मात्र तरही पामतेलाचे दर ३ हजार ८०० रिंगीट प्रतिटनाच्या दरम्यान आहेत. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. नोव्हेंबर महिन्यात रिंगीटचे मुल्य डाॅलरच्या तुलनेत कमी झाले होते. त्यामुळे पामतेलाचे दर वाढल होते.

पण आता रिंगीट मजबूत झाला. त्याचाही परिणाम पामतलेच्या दरावर दिसून येत आहे, असेही युएसडीएने म्हटले आहे.

सध्या पामतेल स्वस्त झाले. त्यामुळे पामतेल आणि सोयाबीन तेलाच्या दरातील तफावत कमी झाली. नोव्हेंबर महिन्यात दोन्ही खाद्यतेलाच्या दरातील तफावत ४९१ डाॅलर प्रतिटन होती.

मात्र आता ही तफावत २०० डाॅलरपर्यंत कमी झाली. दोन्ही तेलाच्या दरातील तफावत कायम राहण्यास वाव आहे, असे युएसडीएने स्पष्ट केले.

रशिया आणि युक्रेन सूर्यफुल तेलाचा साठा कमी करण्यासाठी सवलत देत आहेत. युध्दामुळे दोन्ही देशांमध्ये सूर्यफुल तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात झाला होता.

हा साठा कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तेलाचे दर कमी करून निर्यात वाढवली. त्यातच भारताने सूर्यफुल तेलाची आयात शुल्कमुक्त केली. यामुळे भारतात खाद्यतेल आयात वाढली आहे, असेही युएसडीने म्हटले आहे.

सोयातेलाच्या भावाला आधार

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल आणि सूर्यफुल तेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेल बाजार दबावात आहे. मात्र अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटणार आहे. त्यामुळं सोयातेल उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे.

उत्पादन कमी राहून पुरवठा घटण्याचा अंदाज असल्याने सोयातेलाचा बाजार टिकून आहे. तसेच यंदा जागतिक तेलबिया पेंड उत्पादनही कमी राहील, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला.

सोयापेंडचे भाव तेजीत

सध्या सोयापेंडला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे सोयापेंडचे दर तेजीत आहेत. चीनसह महत्वाच्या वापरकर्त्या देशांनी सोयापेंड आयात वाढवली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागील महिनाभरापासून सोयापेंडचे दर वाढले आहेत.

हे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज आहे. याचा आधार देशातील सोयाबीन बाजाराला मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT