soybean market agrowon
ॲग्रोमनी

Soybeans Market : सोयाबीन बाजारातील स्थिती काय?

देशातील बाजारात मागील दोन दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजार सुधारलेला दिसला.

Team Agrowon

पुणेः देशातील बाजारात मागील दोन दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजार (Soybeans Market) सुधारलेला दिसला. मात्र आज कालपेक्षा दर काहीसे नरमलेले दिसले. तर दुसरीकडे बाजारातील सोयाबीन आवक वाढली आहे. आज देशातील बाजारात सोयाबीनला ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपये सरासरी दर मिळला.

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडचे दर वाढले आहेत. रशिया-युक्रेनमधील वाद पुन्हा सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात पुन्हा सुधारणा होत आहे. सीबाॅटवर सोयातेलाच्या दराने आज ७५ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. त्यामुळे सोयाबीन दरालाही आधार मिळाला.

केंद्र सरकारने मंगळवारी सोयाबीन आणि सोयातेलावरील स्टाॅक लिमिट काढल्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर जाणवला होता. त्यामुळे देशातील सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. काल अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढले होते.

मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जैन आणि अशोक नगर बाजारांमध्ये तर राजस्थानमधील कोटा आणि बाराण तसंच  लातूर, अकोला आणि नागपूर बाजारांमध्ये सोयाबीनच्या कमाल दराने ५ हजार २०० रुपयांचा टप्पा गाठला होता.

आज मात्र सोयाबीन काही बाजारांमध्ये दर काहीसे नरमले होते. दरात आज क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील बाजारांमध्ये सोयाबीनचे दर सरासरी ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान पोचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे नरमले होते. सोयाबीनचे दर १४.५४ डाॅलर प्रतिबुशेल्सवरून आज १४.३९ डाॅलरवर पोचले होते.

तर दुसरीकडे देशातील सोयाबीनमध्ये सध्या ओलावा कमी येतो आहे. सकाळी थंडी जाणवत असली तरी दुपारी ऊन पडत असल्याने सोयाबीन वाळवता येत आहे. ओलावा कमी असल्याने सोयाबीनचे दर काहीसे सुधारले आहेत.

आज सोयाबीनला ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळला. शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT