Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयाबीन दरात काही ठिकाणी सुधारणा

सोयाबीनचा मुख्य ग्राहक असलेल्या चीनमध्ये यंदा वापर वाढण्याची शक्यता आहे. चीनने अमेरिकेकडून आयातही वाढवली.

Anil Jadhao 

पुणे : चीनच्या मागणीचा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजाराला आधार मिळतोय. तर भारतातून सोयापेंड निर्यातीची (Soya Meal Export) गती वाढली आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) मागील काही दिवसांपासून सुधारणा झाली होती.

आज बाजारातील सोयाबीन आवक (Soybean Arrival) काहीशी कमी झाली. तर आजही काही बाजारांमध्ये सोयाबीन दरात किंचित सुधारणा झाली होती.

यंदा जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होणार आहे. ब्राझील आणि चीनमधील सोयाबीन उत्पादनवाढीमुळे जागतिक उत्पादनात वाढ दिसत आहे. ब्राझील जगात सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहे.

मात्र सोयातेल आणि सोयापेंड उत्पादनात आघाडीवर असलेल्या अर्जेंटीनात यंदा उत्पादन घटले. याचा आधार आंतरराष्ट्रीय बाजाराला मिळत आहे.

त्यातच ब्राझीलमधील सोयाबीन काढणी आता सुरु झाली. मात्र काढणीचा वेग सध्या कमी आहे. त्यामुळं अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव मिळतोय.

सोयाबीनचा मुख्य ग्राहक असलेल्या चीनमध्ये यंदा वापर वाढण्याची शक्यता आहे. चीनने अमेरिकेकडून आयातही वाढवली. त्याचाही आधार सोयाबीन दराला मिळतोय. आज दुपारी ४ वाजेपर्यंत सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे १५.२८ डाॅलरवर होते.

तर सोयापेंडचे वायदे ४९८ डाॅलर प्रतिटनांवर होते. सोयाबीनची सरासरी दरपातळी मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढल्याने भारतीय सोयाबीनलाही उठाव मिळत आहे.

बाजारातील सोयाबीन आवक

देशातील बाजारात आज सोयाबीनची जवळपास ३ लाख ५० हजार क्विंटलच्या दरम्यान आवक झाली होती. आज महाराष्ट्रात सर्वाधिक आवक होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील बाजारात आज जवळपास १ लाख ६० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. तर मध्य प्रदेशात १ लाख २५ हजार क्विंटल आणि राजस्थानमध्ये ३० हजार क्विंटल सोयाबीनची शेतकऱ्यांनी विक्री केली.

देशातील दरपातळी

सोयाबीनची दरपातळी काही बाजारांमध्ये आजही सुधारली होती. देशात सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. महाराष्ट्रातील सरासरी दरपातळी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपये आहे.

तर मध्य प्रदेशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

दरवाढीची शक्यता

सध्या अनेक बाजारांमधील सोयाबीनची किमान दरपातळी ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. पण सोयाबीनच्या आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सोयाबीनची भावपातळी यंदा किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT