Soybean Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : तेलबिया पेंड निर्यात वाढल्याने सोयाबीन, मोहरीला आधार

देशात मागील काही वर्षात तेलबिया उत्पादन वाढले. तेलबियापासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर देशात होतो.

Anil Jadhao 

Soybean Rate : देशात सध्या सोयाबीन (Soybean) आणि मोहरीचे दर (Mustard Rate) दबावात आहेत. मोहरीचे दर तर हमीभावापेक्षा कमी आहेत. खाद्यतेलाच्या दरावरही दबाव आहे. त्यामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहेत.

पण देशातून मोहरी आणि सोयाबीन पेंड निर्यात वाढली. याचा फायदा सोयाबीन आणि मोहरी दराला होत आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

देशात मागील काही वर्षात तेलबिया उत्पादन वाढले. तेलबियापासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर देशात होतो. पण तेलबिया पेंडेच्या खपासाठी निर्यातीवर अवलंबून राहावे लागते. यंदा देशातून तेलबिया पेंड निर्यात जवळपास ७७ टक्क्यांनी वाढली आहे.

मोहरीपेंड आणि सोयापेंड निर्यात वाढल्यामुळे एकूण तेलबिया पेंड निर्यातीत वाढ झाल्याचंही एसईएनं म्हटलंय.

एसईएच्या देशातून एप्रिल ते फेब्रुवारी या ११ महिन्यांमध्ये देशातून जवळपास ३८ लाख टन सोयापेंड निर्यात झाली. तर मागील हंगामात याच काळातील निर्यात २१ लाख ३२ हजार टन झाली होती.

भारतात एप्रिल २०२२ मध्ये सोयाबीनचे भाव ७ हजार ६४० रुपये प्रतिक्विंटलवर होते. ते आता सरासरी ५ हजार २०० रुपयांवर आले. सोयाबीनचे भाव नरमल्याने देशातील सोयापेंडचे भावही कमी झाले. त्यामुळे देशातून सोयापेंड निर्यात वाढल्याचे एसईएचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितले.

भारताने या ११ महिन्यांच्या काळात ७ लाख ८७ हजार टन सोयापेंड निर्यात केली. मागील हंगामात याच काळातील निर्यात ३ लाख ४८ हजार टनांवर होती. आग्नेय आशियातील देशांना निर्यातीसाठी भारताला कमी खर्च येतो.

त्यामुळे या देशांना भारताची निर्यात वाढली. तर युरोपियन आणि अमेरिकेतील काही देशही भारतीय सोयापेंडला पसंती देत आहेत.

भारताने या ११ महिन्यांच्या काळात २० लाख ५० हजार टन मोहरीपेंड निर्यात केली. तर मागील हंगामात याच काळातील निर्यात ८ लाख टन निर्यात झाली होती. देशातून मोहरीपेंड निर्यातीने यंदा विक्रम केला.

यापुर्वी २०११-१२ मध्ये भारताने ११ महिन्यांमध्ये १२ लाख ४८ हजार टन मोहरीपेंड निर्यात केली. भारत मोहरीपेंड निर्यात करणारा महत्वाचा देश आहे. भारत सध्या दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड आणि इतर पूर्वेतील देशांना निर्यात सुरु आहे.

दबावातील दराला आधार

देशात यंदा सोयाबीनचा पुरवठा जास्त आहे. तर मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यातच देशातून मोहरीपेंड आणि सोयापेंड निर्यात वाढल्यानं दराला आधार मिळण्याचा अंदाज आहे. सध्या मोहरीला सरासरी ४ हजार ७०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

तर सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर आहे. पण पेंड निर्यात वेगाने सुरु असल्याने दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

अर्जेंटीनाच्या सोयापेंडचे भाव निर्यातीसाठी ६०८ डाॅलर प्रतिटन होते. तर भारतीय सोयापेंड सोयापेंड ५६० डाॅलरवर आहेत. त्यामुळे आग्नेय आशियातील देशांकडून भारतीय सोयापेंडलाच मागणी वाढली.
भारत मेहता, कार्यकारी संचालक, एसईए

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT