Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market Rate : अमेरिकेत सोयाबीन पिकाची पावसाअभावी होरपळ; दरात वाढ

Soybean Market Update : सध्या जागतिक सोयाबीन बाजाराचं लक्ष अमेरिकेतील सोयाबीन पिकावर आहे. अमेरिकेत सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली. पण पावसाने पाठ फिरवली. याचा पिकावर परिणाम होत आहे. यामुळे दरातही सुधारणा दिसून येत आहे.

Anil Jadhao 

Soybean Rate Update : सध्या जागतिक सोयाबीन बाजाराचं लक्ष अमेरिकेतील सोयाबीन पिकावर आहे. अमेरिकेत सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली. पण पावसाने पाठ फिरवली. याचा पिकावर परिणाम होत आहे. यामुळे दरातही सुधारणा दिसून येत आहे.

अमेरिकेच्या सोयाबीनचा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर तुलनेत जास्त परिणाम होत असतो. कारण अमेरिकेतील सोयाबीन सप्टेंबरमध्ये बाजारात येते. तर भारताचे सोयाबीन ऑक्टोबरपासून बाजारात यायला सुरुवात होते.

अनेक अभ्यासक आणि संस्था दोन्ही देशांचा हंगाम एकाच काळात पकडतात. त्यामुळे अमेरिकेत उत्पादन वाढले किंवा घटल्याचा काहीसा परिणाम लगेच देशात जाणवू लागतात. कारण भारताच्या सोयाबीनचे दर प्रामुख्याने सोयापेंड निर्यातीवर अवलंबून असतात. सोयापेंड बाजारावर अमेरिकेचा जास्त परिणाम होत असतो.

आतापर्यंत अमेरिकेतील सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली. अमेरिकेत यंदा पेरा वाढण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. गेल्यावर्षीऐवढेच क्षेत्र अमेरिकेत सोयाबीन खाली आले. पण अमेरिकेतील मध्य पूर्वेतील भागात सध्या उष्ण वातावरण आहे.

मागील काही दिवसांमध्ये या भागात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा अमेरिकेत सोयाबीन उत्पादन ६४ लाख टनांनी वाढून १ हजार २२७ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. पण सोयाबीन उत्पादन शेवटी पाऊसमान कसे राहते यावर अवलंबून राहील. अर्जेंटीनात यंदा उत्पादनवाढीची शक्यता आहे.

तापर्यंत अमेरिकेतील सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली. यंदा अमेरिकेत सोयाबीन उत्पादन ६४ लाख टनांनी वाढून १ हजार २२७ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला. अमेरिकेत यंदा पेरा वाढण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. गेल्या वर्षी ऐवढेच क्षेत्र अमेरिकेत सोयाबीन खाली आले.

पण अमेरिकेतील मध्य पूर्वेतील भागात सध्या उष्ण वातावरण आहे. अनेक भागात पिकाला पोषक पाऊस झाला नाही. मागील काही दिवसांमध्ये या भागात पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादन शेवटी पाऊसमान कसे राहते यावर अवलंबून राहील. पण सध्याच्या वातावरणामुळे शेतीमाल बाजारालाही आधार मिळाला.

किती झाली वाढ?

सोयाबीन उत्पादक भागात पाऊस नसल्याने दरात वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे २.६६ टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १४.६६ डाॅलरवर बंद झाले होते. सोमवारी १३.७३ डाॅलरवर बाजार सुरु झाला होता.

म्हणजेच आठवड्यात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये ९३ सेंटची वाढ झाली होती. सोयापेंडचे वायदेही ५.६२ टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारी सोयापेंडचे वायदे ४१६ डाॅलरवर बंद झाले. सोमवारी सोयापेंडचे वायदे ३७३ डाॅलरवर सुरु झाले होते. सोयातेलाचे वायदेही दोन टक्क्यांनी वाढून ६० सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT