Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस दरात नरमाई; आवकही जास्तच!

Cotton Rate : देशातील बाजारात आज कापूस दर आणि वायद्यांमध्ये नरमाई दिसली. खरिपातील कापूस लागवडी सुरु झाल्या तरी भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

Anil Jadhao 

Cotton Production : देशातील बाजारात आज कापूस दर आणि वायद्यांमध्ये नरमाई दिसली. खरिपातील कापूस लागवडी सुरु झाल्या तरी भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कापूस भाव आज केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दबावात होते. देशातील बाजारात आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला.

देशातील बाजारात कापूस दरातील नरमाई अद्यापही कायम आहे. कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर खिळून आहेत. दुसरीकडे बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा जास्त दिसते. गेल्यावर्षीपर्यंत जून महिन्यातील आवक खपूच होती.

मागील हंगामातही या काळातील आवक कमीच होती. सरासरी १० हजार गाठींपेक्षा कमी आवक जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात होती. पण सध्या ५० ते ५५ हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. म्हणजेच सध्याही कापसाची आवक सरासरीपेक्षा ४ ते ५ पटींनी जास्तच आहे. याचा दबाव दरावर दिसत आहे.

कापूस आवकेचा विचार करता आजही महाराष्ट्रातील आवक जास्त होती. राज्यातील बाजारात सध्या कापूस आवक अधिक आहे. त्यातच पावसाच्या तोंडावर काही जिनिंग बद होत आहेत. काही बाजारांमधील लिलावही बंद होणार असल्याची माहिती मिळाली.

यामुळेही शेतकरी कापूस विक्रीची घाई करत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये कापूस आवक जास्त आहे. तर इतर राज्यातील आवक सरासरीऐवढी होत आहे.

सोबतच कापड उद्योगांकडून सुताला मागणी नसल्याचे सुतगिरण्यांकडून सांगण्यात येते. सुताला मागणी नसल्याने सुताचे भाव कमी झाले. याचा दबाव कापूस दरावर आला. युरोप, अमेरिका, आशियातील बाजारांमधून कापडाला उठाव कमी असल्याचेही सांगितले जाते. देशातून यंदा सूत आणि कापड निर्यातही कमी झाली. याचा दबाव कापूस बाजारावर येत गेला, असे उद्योगांकडून सांगण्यात आले.

देशातील बाजारात कापूस दरात आजही काहीशी नरमाई दिसली. कापसाच्या दरात क्विंटलमागं सरासरी ५० ते १०० रुपये घट होती. तर काही ठिकाणी आज बाजार स्थिर होता.

कापसाला आज सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. कापसाला कमाल भाव काही बाजारांमध्ये ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान पोचला. पण हा भाव अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसासाठी मिळत आहे.

देशातील कापूस वायद्यांमध्येही आज काहीशी नरमाई दिसली. कापसाचे वायदे आज खंडीमागे १८० रुपयांनी नरमले होते. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत कापूस वायद्यांनी ५६ हजार ९६० रुपयांचा टप्पा गाठला. वाद्यांमधील हा भाव यंदाचा निचांकी मानला जात आहे. ऐन खरिपातील लागवडी सुरु झाल्यानंतर कापूस दरात घट झाली आहे.

त्यामुळे शेतकरी यंदा कापूस लागवडीला कमी प्राधान्य देण्याची शक्यता वर्तविली जाते. पण कापूस उत्पादक भागात इतर पिकांचा पर्याय कमी असतो. त्यामुळे लागवड कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT