Cotton Seed Shortage Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Seed Shortage : देशातील काही भागांमध्ये बीटी कापूस बियाण्याची टंचाई

Cotton Cultivation : एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या पावसाने देशातील कापूस लागवडीने वेग घेतला. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत कापूस लागवड अधिक होण्याचा अंदाज बियाणे उद्योग व्यक्त करत आहे.

Team Agrowon

Cotton Update : एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या पावसाने देशातील कापूस लागवडीने वेग घेतला. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत कापूस लागवड अधिक होण्याचा अंदाज बियाणे उद्योग व्यक्त करत आहे.

त्यामुळे ब्रॅन्डेड कंपन्यांच्या बीटी कापूस बियाण्याची मध्य आणि दक्षिण भारतात काहीशी टंचाई भासत असल्याचे विक्रेत्या कंपन्या आणि बियाणे कंपन्यांनी सांगितले.

चालू हंगामात एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे कापूस उत्पादनात महत्वाच्या गुजरात आणि महाराष्ट्रात लागवडीच्या कामांना गती आली. तर उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये कापूस लागवड शेवटच्या टप्प्यात आली.

त्यामुळे ब्रॅन्डेड कंपन्यांच्या कापूस बियाण्याची विक्री झपाट्याने झाली. परिणामी या कंपन्यांच्या बियाण्याचा पुरवठा मर्यादीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रासी सिड्सचे अध्यक्ष एम रामासामी यांनी बिझनेसलाईनला दिलेल्या माहीतीनुसार, महाराष्ट्रात १ जूनपुर्वी बीटी कापूस बियाणे विक्रीला परवानगी दिली नाही. पण मागील काही दिवसांपासून बियाणे विक्री वाढली आहे. गेल्या हंगामातील बीटी कापूस बियाण्याचा स्टाॅक कमी आहे. तर यंदा पावसामुळे बियाणे उत्पादनावर परिणाम झाला.

सध्या देशातील बाजारात कापसाचे भाव पडले आहेत. पण कापसाला मिळणारा भाव सोयाबीन आणि मक्याच्या तुलनेत जास्तच आहेत. त्यामुळे भाव कमी झाले तरी शेतकरी चालू हंगामात कापसालाच पसंती देतील. त्यामुळे कापूस लागवड वाढेल, असा अंदाज बियाणे उद्योगांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

क्रीस्टल क्राॅप प्रोटेक्शनच्या सीड बिझनेसचे कार्याकरी संचालक सत्यंदर सिंग म्हणाले की, कापसाचे भाव इतर पिकांच्या तुलनेत सध्याही चांगले आहेत. त्यामुळे यंदा कापसाची लागवड वाढली नाही तरी स्थिर राहील. गुजरातमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत लवकर लागवड झाली. सध्या ब्रॅन्डेड कंपन्यांच्या बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

किती बियाणे लागते?

भारतात बीटी कापूस बियाण्याची बाजारपेठ झपाट्याने वाढली. देशात बीटी कापूस बियाणे मार्केट ४ ते ४.५ कोटी पाकीटांचे आहे. एक पाकीट ४५० ग्रॅमचे असते. कापूस लागवडीची गरज भागल्यानंतर देशात दरवर्षी १ ते १.५ कोटी पाकीटे शिल्लक असतात. पण यंदा गेल्या हंगामातील शिल्लक स्टाॅक खूपच कमी आहे.

बीटी कापूस बियाण्याला मागणी असल्याने काही कंपन्यांच्या बियाण्याचा पुरवठा कमी दिसतो. मागील हंगामात पाऊस आणि इतर कारणांमुळे बीटी कापूस बियाण्याचे उत्पादन कमी झाले होते. याचा परिणाम सध्या पुरठ्यावर होत आहे.
राम कौंडिन्या, महासंचालक, फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT