Chana Market  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : हरभरा नोंदणीसाठी झुंबड का उडाली?

अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर केंद्रावर रविवारीच अर्धा किलोमीटरची रांग लावली होती.

Team Agrowon

Chana Rate : हमीभावाने हरभरा (Chana MSP) विक्रीसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात झाली. नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली. काही केंद्रांवर तर शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली.

अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर केंद्रावर रविवारीच अर्धा किलोमीटरची रांग लावली होती. सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळेच नाफेडला हरभरा (NAFED Chana Procurement) घालण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

देशात यंदा हरभऱ्याचा पेरा २ टक्क्यांनी कमी राहिला. यंदा ११२ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. गेल्याहंगामातील लागवड ११४ लाख हेक्टरवर होती. देशात हरभरा लागवडीत यंदा महाराष्ट्राने आघाडी घेतली.

महाराष्ट्रात सर्वाधिक २९ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला. म्हणजेच देशातील एकूण पेरणीपैकी जवळपास २६ टक्के हरभरा क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक हरभरा पेरा झाल्यानं सहाजिकच बाजाराचं लक्ष राज्यातील हरभरा उत्पादनकडं आहे. सरकारनं यंदा हरभरा उत्पादन वाढीचा अंदाज जाहीर केला.

राज्यातील अनेक बाजारांमध्ये सध्या नवा हरभरा दाखल होत आहे. पण दुसरीकडे नाफेडची हरभरा विक्रीही सुरु आहे. परिणामी बाजारात हरभरा दर दबावात आहेत.

हरभऱ्याचे बाजारभाव

सरकारनं यंदा हभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण नाफेडच्या विक्रीमुळं खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

म्हणजेच हरभरा हमीभावापेक्षा किमान ३०० ते ५०० रुपयाने स्वस्त विकला जात आहे. हरभरा आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढू शकतो, अशी शक्यता सध्यातरी व्यक्त केली जात आहे.

बाजारातील हीच स्थिती लक्षात घेऊन शेतकरी हमीभावाने हरभरा विक्रीसाठी प्रयत्नशील आहेत. किमान हमीभाव पदरात पाडून घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. हमीभावाने हरभरा विक्रीसाठी आजपासून सुरुवात झाली.

पण खुल्या बाजारातील दर पाहता नाफेडकडेच शेतकऱ्यांचा ओढा आहे. त्यामुळं हरभरा नोंदणीसाठी एकच झुंबड उडाली. सर्वच नोंदणी केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

उष्णतेचा उत्पादकतेला फटका

दुसरीकडे वाढलेल्या उष्णतेचा फटका हरभरा पिकाला बसताना दिसतोय. तसचं महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हरभरा उत्पादकता घटल्याचंही पुढे येत आहे.

त्यामुळं यंदा देशातील हरभरा उत्पादन सरकारच्या उद्दीष्टापेक्षा कमीच राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झाल्यास नाफेडच्या खरेदीमुळं खुल्या बाजारातही हरभरा दर सुधारण्यास मदत होऊ शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT