Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस वायद्यांमध्ये पुन्हा सुधारणा; शेतकऱ्यांना आज काय भाव मिळाला?

Cotton Rate : कापूस वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली. देशातील कापूस वायदे आज ७०० रुपयांनी सुधारले होते.

Team Agrowon

Cotton Bajarbhav : कापूस वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली. देशातील कापूस वायदे आज ७०० रुपयांनी सुधारले होते. पण वायद्यांमधील या सुधारणेचा बाजार समित्यांमधील दराला काहीच आधार मिळाला नाही. कापूस दर आजही स्थिर होते.

कापूस बाजारात सध्या कोंडीची स्थिती तयार झाली आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी जास्त असल्याने मोठा फटका बसत आहे. तसा सध्या काळ हा कापूस आवकेचा नसतो.

जुलैच्या सुरुवातीला बाजारातील कापूस आवक अगदी निचांकी पातळीवर आलेली असते. पण यंदा चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला. नंतर मात्र कापसाचे पॅनिक सेलिंग सुरु झाले. आवकेचा दबाव आल्याने बाजार दबावात येत गेला.

तसेच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आणि सुताला मागणी कमी झाली. कापड निर्यातही घटली. याचा थेट परिणाम कापूस बाजारावर होत असल्याचे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले.

सध्या सुताला उठाव नसल्याने सुतगिरण्यांकडून कापूस गाठींची उचल कमी झाली. त्यामुळे जिनिंगकडे स्टाॅक पडून राहत आहे, असे जिनिंग चालकांनी सांगितले. तर दुसरीकडे कापूस आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. पण पुढे अपेक्षेप्रमाणे मागणी नाही.

यामुळे कापसाचे भाव कमी झाले, असे उद्योगांकडून सांगण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून कापूस केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दबावात आहे.

कापूस वायद्यांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. चालू आठवड्यात देशातील कापूस वायद्यांनी हंगामातील निचांकी टप्पा गाठला होता. आज दुपारी ३ वाजेपर्यंत एमसीएक्सवर कापूस वायदे ६८० रुपयांनी वाढून ५६ हजार ७०० रुपयांवर पोचले होते. तर एनसीडीईएक्सवरील स्पाॅटचे रेट २६ हजार ६०० रुपये प्रतिगाठींवर होते.

एका गाठीमध्ये १७० किलो रुई असते. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज कापूस वायदे सुधारले होते. आज कापूस वायद्यांनी ८० सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता.

वायद्यांमध्ये चढ उतार सुरु असले तरी बाजार समित्यांमध्ये मात्र कापूस भाव स्थिर दिसले. आज कापसाला सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार १०० रुपये भाव मिळाला. काही बाजारांमध्ये सरासरी दरात वाढ झाली होती. पण सरसकट विचार करता बाजार स्थिर दिसला. पुढे सूत आणि कापडाला उठाव कमी असल्याने सध्या बाजारावर दबाव आहे.

पण आता शेतकऱ्यांकडील कापूस कमी झाला. पुढील काळात आवक कमी होईल. तर खरिपातील लागवडींनी अद्यापही वेग घेतला नाही. त्यामुळे कापूस बाजारावर लागवडीची गती आणि पाऊसमान याचाही परिणाम होऊ शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT