Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस बाजारावरील दबाव वाढला; कापूस भाव पुन्हा निचांकी पातळीवर

Cotton Rate Update : देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. मागील महिनाभरात कापसाचे भाव साडेसात टक्क्यांनी कमी झाले.

Team Agrowon

Cotton Bajarbhav : देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. मागील महिनाभरात कापसाचे भाव साडेसात टक्क्यांनी कमी झाले. कापूस खंडीचेही भाव ६० हजारांवरून ५५ हजारांवर आले. जून महिना ऑफ सिजन समजला जातो. तरीही कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर आहेत.

सध्या बाजारात कापडालाही उठाव कमी आहे. रशिया युक्रेन युध्दामुळे महत्वाच्या बाजारापेठांवर परिणाम झाला. तर युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडम या महत्वाच्या बाजारांना मंदीसदृश स्थितीचा फटका बसत आहे.

या बाजारापेठांमधून कापडाला कमी उठाव मिळत आहे. कापडाला उठाव नसल्याने सुताला उठाव नाही. याचा थेट परिणाम कापूस गाठींच्या उलाढालीवर होत आहे. सुतगिरण्या गरजेप्रमाणे कापूस गाठी खरेदी करत आहेत. तर कापड उद्योगही गरजेप्रमाणे सुताची खरेदी करत असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात आले.

जागतिक पातळीवरच मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देशातून निर्यात घटली. निर्यातीअभावी शिल्लक असलेल्या मालाचा वापर देशात होऊ शकला नाही. त्यामुळे देशातील बाजारावर दबाव आला, असे निर्यातदारांच्यावतीने सांगण्यात आले. जागतिक पातळीवर सध्या सुताचा साठा कमी आहे. पण तरीही मागणी नाही. त्यामुळे भारतातून जी कापूस आणि सूत निर्यात व्हायला पाहिजे ती होऊ शकली नाही.

चालू वर्षात देशातून कापड निर्यात १४ टक्क्यांनी कमी झाली. तर सूत, तयार कपड्यांची निर्यात जवळपास २७ टक्क्यांनी घटली आहे. मे महिन्यातील ही घट १२ टक्के होती. सूत कमी दरात देण्याची तयारी असली तरी मागणी येत नाही.

सध्या कापसाचे भाव हंगामातील निचांकी भावावर आहे. यामुळे जागतिक पातळीवरून मागणी येण्याची आशा आहे. कापसाचे भाव निचांकी पातळीवर राहिल्यास निर्यातही वाढू शकते, असे सुतगिरण्यांकडून सांगण्यात आले.

सध्या देशातील बाजारात कापूस खंडीचे भाव ५५ हजार ते ५६ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. मागील महिन्यात हाच भाव ६० हजार रुपयांवर होता. तर बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. या महिन्यात कापासचे भाव क्विंटलमागं ३०० रुपयांनी नरमले आहेत.

यंदा कापसाची आवक एप्रिलनंतर वाढली. हे पहिल्यांदाच घडत आहे. भारतातून खर तर या काळात निर्यातही कमी झालेली असते. पण यंदा एप्रिलनंतरच खरा आवकेचा हंगाम सुरु झाला की काय असे वाटते. सध्याची आवकही जास्तच आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात रोज ४० हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे.

सध्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात कापूस आहे. त्यामुळे पुढील काळातही कापूस आवक दिसू शकते. तर कापूस गाठी आणि सुताची मागणी पाहता बाजारातील हे चित्र आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT