Turmeric Agrowon
ॲग्रोमनी

Turmeric : टपाल विभाग करणार वायगाव हळदीचे ब्रँडिंग

भौगोलिक मानांकन प्राप्त वायगाव हळदीला देशव्यापी ओळख मिळावी, या साठी टपाल विभागातर्फे विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले.

टीम ॲग्रोवन

वर्धा : भौगोलिक मानांकन प्राप्त वायगाव हळदीला (Waygaon Turmeric) देशव्यापी ओळख मिळावी, या साठी टपाल विभागातर्फे विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर उत्पादन (Turmeric Production)होणाऱ्या वायगाव हळदीच्या भौगोलिक मानांकनासाठी वायगाव हळद उत्पादक संघाने पुढाकार घेतला होता. या हळदीचे वैशिष्ट्य म्हणजे गडद रंग आणि कुरकुमीनचे प्रमाण यामध्ये अधिक आहे. ही वैशिष्ट्ये जपल्यामुळेच या हळदीला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले होते.

दरम्यान, केंद्र सरकारने देशातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या व देशाची वेगळेपण सिद्ध करणाऱ्या उत्पादनांना टपाल विभागाच्या माध्यमातून देश व जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अंतर्गत वायगाव हळदीचा उल्लेख असलेला विशेष टपाल लिफाफा प्रकाशित करण्यात आला आहे. टपाल विभागातर्फे एकच वेळी देशात दहा ठिकाणी या लिफाफ्याचे लोकार्पण करण्यात आले. वर्धा येथे झालेल्या लोकार्पण सोहळ्याला पोस्ट अधीक्षक मूर्ती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, ब्रह्मानंद पांगुळ, पंकज भगत उपस्थित होते.

देशातील प्रसिद्ध उत्पादनांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने टपाल विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये वायगाव हळदीचा समावेश केला आहे.
डॉ. विद्या मानकर, अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: हार्वेस्टरने उसाच्या तोडणीतून देशासमोर आदर्श: दिलीपराव देशमुख

Peek Pahani: उन्हाळी हंगामासाठी पीक पाहणी सुरु, पीक नोंदणीचे फायदे काय?

Jal Jeevan Mission: ‘जल जीवन’ला वीज जोडणीची प्रतीक्षा

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; मक्यात काहिशी सुधारणा,गव्हाचे भाव स्थिरावले तर कैरीला काकडीला उठाव

Bajari Awak: खानदेशात बाजरीची आवक सुरू; दर मात्र स्थिर

SCROLL FOR NEXT