Tea Export Agrowon
ॲग्रोमनी

भारताचा ‘चहा’ अनेक देशांनी केला परत

जागतिक चहा बाजारात श्रीलंकेची स्थिती अस्थिर झाल्याने भारतीय (India) चहा मंडळ निर्यात वाढवण्यावर विचार करित आहे; मात्र बॅचेस परत केल्याने बाहेरील शिपमेंटमध्ये घसरण होत आहे.

टीम ॲग्रोवन

कोलकाता : भारतीय चहा निर्यातदार (Indian Tea Exporter) संघाचे (आयटीईए) अध्यक्ष अंशुमान कनोरिया (Anshuman Kanoriya) यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय आणि देशातील खरेदीदारांनी (International Buyer) कीटनाशके आणि रसायने निश्‍चित केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याने चहाच्या बॅचेसची (Tea Batch) एक मालिका परत करण्यात आली आहे. जागतिक चहा बाजारात श्रीलंकेची स्थिती अस्थिर झाल्याने भारतीय (India) चहा मंडळ निर्यात वाढवण्यावर विचार करित आहे; मात्र बॅचेस परत केल्याने बाहेरील शिपमेंटमध्ये घसरण होत आहे.

‘एफएसएसएआय’ मापदंडात अनेकांना हवीय सूट

‘पीटीआय’शी बोलताना कनोरिया म्हणाले, की देशात विकला जाणारा सर्व चहा भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) मापदंडानुसार व्हायला हवा; मात्र बहुतेक खरेदीदार चहा खरेदी करीत आहेत. त्यात रासायनिक अंश असामान्यापेक्षा जास्त आहे. कायद्याचे पालन करण्याऐवजी अनेक जण एफएसएसएआय मानके अधिक शिथिल करण्याचा आग्रह करीत आहेत; मात्र यामुळे एक चुकीचा पायंडा पडू शकतो, असे कनोरिया म्हणाले.

मंडळाचे लक्ष्य ३० कोटी किलोचे

अनेक देश चहासाठी कडक नियमांचे पालन करीत आहेत. बहुतेक देश युरोपियन संघाच्या मानकांचे पालन करतात. ती ‘एफएसएएसआय’पेक्षा अधिक कठोर आहेत, असे कनोरिया म्हणाले. २०२१ मध्ये भारताने १९५.९० दशलक्ष किलोग्रॅम चहाची निर्यात केली. प्रमुख खरेदीदार राष्ट्रमंडळ (सीआयएस) देश आणि इराण होते. मंडळाचे या वर्षीचे लक्ष्य ३० कोटी किलोग्रॅम चहाची निर्यात गाठण्याचे आहे. भारताने २०२१ मध्ये ५ हजार २४६.८९ कोटी रुपयांची चहाची निर्यात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT