Maize Rate Agrowon
ॲग्रोमनी

Maize Rate : मका भाव खाणार

आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला मागणी असल्याने निर्यातही चांगली होत आहे. त्यामुळे मक्याच्या दरात सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 


पुणेः देशातील बाजारात सध्या खरिपातील मक्याची आवक (Maize Arrival) वाढत आहे. मात्र दुसरीकडे मक्याचा दर हमीभावापेक्षा अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला मागणी (Maize) असल्याने निर्यातही (Export) चांगली होत आहे. त्यामुळे मक्याच्या दरात (Maize Rate) सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रनेवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचा पुरवठा कमी झाला होता. देशातून मका निर्यात चांगली झाल्याने दरवाढ झाली होती. याचा फायदा मक्याला झाला. ऑगस्ट महिन्यात मक्याने प्रतिक्विंटल २ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून मका दर नरमले होते. त्यातच खरिपातील मका पिकाचाही दबाव बाजारावर होता.

देशात यंदा खरिपात २३१ लाख टन मका उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला होता. मात्र देशात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाने मका पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच नोव्हेंबर महिन्यातही बहुतेक भागांमध्ये सतत पाऊस झाला. याचा फटका मका पिकाला बसला. अनेक भागात पीक हातचे गेले तर काही ठिकाणी मक्यावर काही भागांमध्ये कीड-रोगांचाही प्रादुर्भाव आढळून आला होता.

मका पिकाला फटका बसल्याने यंदा उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रक्रिया उद्योगाने खरिपातील मका उत्पादन घटेल, असे सांगितले. तसेच पाऊस आणि कीड-रोगाने मक्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. परिणामी राज्यातील खरिपातील मका पुरवठा गेल्यावर्षीच्या हंगामातील पुरवठ्यापेक्षा कमीच राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योजक आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. मात्र कर्नाटकातील मका पिकाचे जास्त नुकसान झाल्याचे अहवाल नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील मका उत्पादन गेल्यावर्षीऐवढे होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

सध्याची दरपातळी एकूणच काय दर यंदा खरिपातील मका उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला मागणी असल्याने निर्यातही जोमात सुरु आहे. त्यामुळे सध्या नव्या मक्याची बाजारात आवक सुरु असूनही दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. खरिपासाठी केंद्राने यंदा १९६२ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला होता. मात्र सध्या देशातील बाजारात सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

दर वाढणार खरिपातील घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या मागणीमुळे मका दर वाढलेले आहेत. त्यातच बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमीच आहे. रब्बीतील लागवड वाढत असली तरी पीक येण्यास खूप वेळ आहे. त्यामुळे मका दरात पुढील काळात २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Review : दुष्काळी परिस्थितीचा आढावा; बीड जिल्ह्यात पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक

Drought Management : दुष्काळाला सामोरे जातांनाकाटेकोर नियोजन करा; विभागीय आयुक्त जी.श्रीकांत : परभणीत आढावा बैठक

Mahagaon Sugarcane Harvesting : महागाव परिसरात हार्वेस्टरने ऊसतोड सुरू

AI In Agriculture : ‘एआय’च्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दुष्काळातही फळबागांना संजीवनी; सातारा जिल्ह्यात कृषी विभागाचा उपक्रम

Soybean Price: येवला बाजारात सोयाबीनची भरारी; क्विंटलला ७ हजार २५१ रुपयांचा दर

SCROLL FOR NEXT