Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयाबीन बाजाराची दिशा काय राहू शकते?

Soybean Rate : देशातील बाजारात सोयाबीनचे भाव घसरले आहेत. बाजारातील आवक वाढत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही दर कमी झाले.

Anil Jadhao 

Soybean Bajarbhav : देशातील बाजारात सोयाबीनचे भाव घसरले आहेत. बाजारातील आवक वाढत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही दर कमी झाले. याचाही दबाव देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच केंद्र सरकारने यंदा देशातील सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचा अंदाज व्यक्त केला.

सध्या सोयाबीनला ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा दर मिळत आहे. सोयाबीनचे भाव पुढील काळात देशातील पाऊसमान आणि पेरणीवर अवलंबून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावात आहेत. खरिपासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री वाढवत आहेत. परिणामी बाजारात आवकेचा दबाव येऊन दर कमी होत आहेत. सध्या देशातील बाजारात रोज १ लाख २० ते १ लाख ३० हजार क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन आवक होत आहे.

सध्या सुरु असलेली आवक मे महिन्यातील आवकेच्या तुलनेत खूपच जास्त आहे. यामुळे दरही नरमले आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा दर मिळत आहे.

इकडे सोयाबीन बाजार दबावात असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मात्र यंदा देशात विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज दिला. तसं केंद्र सरकारच्या पीक उत्पादनाच्या अंदाजावर बाजार बहुतेक वेळा चालत नाही, असे ठाम मत अनेक बाजार विश्लेषक, व्यापारी, उद्योग आणि निर्यातदार व्यक्त करतात.

देशातील पीक उत्पादनाची अचूक आकडेवारी काढण्यासाठी सरकारने सक्षण यंत्रणाच उभी केली नाही, अशी सतत टीका होते. अमेरिकेचा कृषी विभाग केवळ अमेरिकेतीलच नाही तर जगभरातील महत्वाच्या देशांमधील उत्पादनाचे अंदाज देते.

प्रत्येक महिन्याला अहवाल प्रसिध्द केला जातो. पण भारत सरकारच्या अंदाजावर देशातील उद्योगही विश्वास ठेवताना दिसत नाहीत. तिसऱ्या अंदाजातही असंच काहीसं दिसतं.

भारत सरकारने २०२२-२३ च्या तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील सोयाबीन उत्पादन १५० लाख टनांवर पोचल्याचं म्हटले आहे. वास्तविक यंदा अनेक भागात सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसला होता. काही भागात सोयाबीनचे पीक चांगले होते. पण काही भागात पिकाचे नुकसान झाले. तसेच गुणवत्ताही खालावली. याचा फटका उत्पादकतेला बसला. पण सरकारने यंदा सुरुवातीपासूनच विक्रमी उत्पादनाचा अंदाज दिला.

सरकारच्या मते गेल्या हंगामात देशात जवळपास १३० लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. ते यंदा १५० लाख टनांवर पोचले. म्हणजेच यंदा उत्पादनात २० लाख टनांची वाढ झाली. सरकारच्या या उत्पादनाशी शेतकरी सहमत दिसत नाहीत.

तर दुसरीकडे उद्योगांची संघटना असलेल्या सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज १२४ लाख टन दिला. सोपाने या महिन्यात उत्पादनाचा अंदाज वाढवला. पण सरकारच्या अंदाजाच्या तुलनेत मोठी तफावत दिसते. सरकार आणि सोपाच्या अंदाज तब्बल २६ लाख टनांची तफावत दिसते.

शेतकरी नाइलाजाने सोयाबीन विकताना दिसत आहेत. व्यापारी आणि उद्योगांकडून त्याचा फायदा घेतला जातोय. पण सराकरनेही विक्रमी उत्पादनाचा अंदाज दिल्याने भाव पाडण्यासाठी आयते कोलीत मिळाले. पेरणीसाठी आणखी काही दिवस सोयाबीन बाजारात येऊ शकते. पण त्यानंतर बाजारातील आवक पुन्हा मर्यादीत होऊ शकते.

हवामान विभागाने यंदा महत्वाच्या सोयाबीन उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला. पण अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त केली.

तसेच जून महिन्यात देशभरात पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पेरणी वेळेत होते का? आणि पेरणीची गती कशी राहते? यावरही बाजार अवलंबून राहील. हे घटक जसजस स्पष्ट होत जातील तसे बाजारात चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT