Cotton Market  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : जागतिक कापूस उत्पादन घटलं; दर टिकून राहतील?

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं जागतिक कापूस उत्पादनाच्या अंदाजात कपात केली. पण चीन, बांगलादेश, पाकिस्तान, टर्की या महत्वाच्या वापरकर्त्या देशांमधील कापूस आयात कमी राहील, असंही म्हटलंय.

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः अमेरिकेच्या कृषी विभागानं (American Agriculture Department) अर्थात युएसडीएनं जागतिक कापूस उत्पादनाच्या (Cotton Production) अंदाजात कपात केली. पण चीन, बांगलादेश, पाकिस्तान, टर्की या महत्वाच्या वापरकर्त्या देशांमधील कापूस आयात (Cotton Import) कमी राहील, असंही म्हटलंय.

पण यंदा कापूस दर टिकून राहतील असा अंदाजही व्यक्त केला. भारतातही उद्योगांकडून आणि निर्यातीसाठी कापूस मागणी वाढली. त्यामुळे देशातील कापूस बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

युएसडीएने जागतिक कापूस उत्पादनाच्या अंदाजात १८ लाख गाठींची कपात केली. जागतिक कापूस उत्पादन १ हजार ४६३ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

तर मागील हंगामातील उत्पादन १ हजार ४८१ लाख गाठींवर होते, असे युएसडीएनं स्पष्ट केले. तर जागतिक कापूस वापरही यंदा काहीसा कमी राहून शिल्लक साठाही अधिक राहील.

मागील हंगामात जागतिक पातळीवर १ हजार ५०१ लाख गाठी कापूस वापर झाला होता. तो यंदा १ हजार ४१५ लाख गाठींवर स्थिरावेल.

म्हणजेच यंदा ८६ लाख गाठी कापूस वापर कमी होईल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला. 

कोणत्या देशांची
कापूस आयात घटणार

कापूस आयातीचा विचार करता, यंदा चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि टर्की या महत्वाच्या आयातदार देशांची कापूस आयात काहीशी कमी होईल.

पण या देशांची आयात  आयात जास्त कमी होणार नाही, असा अंदाजही युएसडीएनं व्यक्त केला.

चीनची कापूस आयात यंदा १ लाख २८ हजार गाठी, पाकिस्तान ७ लाख गाठी, बांगलादेश ३ लाख गाठी आणि टर्कीची आयात ७ लाख गाठींनी कमी राण्याचा अंदाज आहे.

बांगलादेशची आयात किंचित घटणार
भारतासाठी बांगलादेशमधील परिस्थिती महत्वाची आहे. कारण भारताच्या कापसाचा बांगलादेश महत्वाचा ग्राहक आहे.

बांगलादेशने मागील हंगामात १०४ लाख गाठी कापूस आयात केली होती. यंदा बांगलादेश १०१ लाख गाठी कापूस आयात करण्याची शक्यता आहे, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला.

पाकिस्तानची आयात स्थिर
यंदा शेजारच्या पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादनात मोठी घट झाली. पाकिस्तानमधील उत्पादन २६ लाख गाठींनी कमी होऊन ५० लाख गाठींवर स्थिरावलं. तर पाकिस्तानची आयात यंदा गेल्यावर्षीएवढीच राहील.

पाकिस्तानमधील कापड उद्योगाला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं यंदा उत्पादन घटलं तरी पाकिस्तानची कापूस आयात ५७ लाख गाठींवर स्थिरावेल, अशा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला.

दराचा अंदाज आणि बाजारभाव
युएसडीएनंही यंदाच्या हंगामात अमेरिकेतील शेतकऱ्यांना सरासरी ८४ सेंट प्रतिपाऊंडचा दर मिळेल, असा अंदाज जाहीर केला.

तर मागील महिनाभरात कापसाचे वायदे ८४ ते ८७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. काॅटलूक ए इंडेक्सही १०० सेंट प्रतिपाऊंडच्या जवळपास फिरतोय.

यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज आहे.

 

भारतात बाजाराला पोषक स्थिती
युएसडीएनं भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज १३ लाख गाठींनी कमी करून ३२६ लाख गाठींवर आणला.

देशातील उद्योगांनीही हा अंदाज बरोबर असल्याचे सांगितले. भारतात सध्या कापसाचे दर दबावात आहेत.

या दरात कापूस निर्यातही सुरु झाली. सुतगिरण्याही ८५ ते ९० टक्के क्षमतेने सुरु झाल्या. सुतगिरण्यांना नफाही होत असल्याचं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी स्पष्ट केलं.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव टिकून आहेत. त्यामुळं देशातील कापूस बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT