Strawberries Agrowon
ॲग्रोमनी

स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूटसाठी ९० टक्‍के अनुदान

नावीन्यपूर्ण पिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्ह्यात होत आहे. त्यानुसार स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फ्रूटसाठी ९० टक्‍के अनुदान दिले जाईल.

ॲग्रोवन वृत्तसेवा

गडचिरोलीः जिल्ह्यात गेल्या वर्षी ५४० हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली. या वर्षी हे उद्दिष्ट ७४० हेक्‍टरचे आहे. जिल्ह्यात यंदा नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ९० टक्‍के अनुदानावर ड्रॅगन फ्रूट व स्ट्रॉबेरी लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिली.

खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. मीना म्हणाले, की नावीन्यपूर्ण पिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्ह्यात होत आहे. त्यानुसार स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फ्रूटसाठी ९० टक्‍के अनुदान दिले जाईल. त्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यांसह वेळेत खतपुरवठा करावा. जिल्ह्यात दुर्गम भाग अधिक आहे. त्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने यंत्रणा उभारावी. खताची गरज लक्षात घेऊन योग्य किमतीमध्ये सर्वांना आवश्‍यकतेनुसार खताचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणा व पुरवठादार यांच्यासोबत समन्वय गरजेचा आहे.

दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज माळी यांनी खरीप हंगामाविषयीची माहिती दिली. यंदा २ लाख १९ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यात एक लाख ८० हजार हेक्‍टर भात, तीन हजार हेक्‍टर मका, १२ हजार हेक्‍टर तूर, तर सोयाबीन १ हजार ५०० हेक्‍टर, तीळ ७५० हेक्‍टर, कापूस २० हजार २०० हेक्‍टरवर राहील, असे त्यांनी सांगितले.

पीक कर्ज वाटपाचे नियोजन

जिल्ह्यात यंदा २४५.५७ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन आहे. मध्यवर्ती बॅंक ८५.९५ कोटी, ग्रामीण बॅंक ३६.१७, तर राष्ट्रीयीकृत बॅंक १२३.४५ कोटी या प्रमाणे उद्दिष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT