Egg Rate Agrowon
ॲग्रोमनी

Egg Rate : अंड्यांच्या दरात सुधारणा

कोंबड्यांच्या उत्पादन खर्चात आणि मागणी वाढल्याने अंड्यांच्या दरात सुधारणा झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः कोंबड्यांच्या उत्पादन खर्चात (Poultry Production Cost) आणि मागणी वाढल्याने अंड्यांच्या दरात सुधारणा (Egg Rate Improve) झाली आहे. चार महिन्यांपूर्वी पाच रुपये नग या दराने किरकोळ बाजारात (Retail Egg Price) मिळणारे अंडे आता सात रुपयांवर पोहोचले आहे. देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मागणी वाढली आहे. परिणामी, अंड्यांच्या दरात सुधारणा झाली आहे.

कांदा, टोमॅटोसह सर्वच भाज्यांच्या दरवाढीने सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे अनेकांनी अंड्यांकडे आपली पावले वळविली आहेत. खाद्यप्रेमींकडून अंड्यांना विशेष पसंती दिली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत शहरात अंड्यांची मागणी वाढली आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत जिल्ह्याच्या विविध भागांतून व परराज्यांतूनही आवक होत आहे. शहरात दिवसाकाठी आठ ते दहा लाख अंड्यांची मागणी आहे. परंतु आवक पाच ते साडेपाच लाख इतकी होते. जानेवारी महिन्यात ४ रुपये १५ पैसे असलेले अंड्यांचे घाऊक बाजारातील दर ५ रुपये ३० पैसे झाले आहेत. म्हणजे किमतीतही १ रुपयाने सुधारणा झाली आहे. यामुळे डझनाच्या भावातही वाढ झाली असून, आधी ६० रुपये डझन मिळणारे अंडे आता ७ रुपये नग झाले आहे. त्यामुळे डझनासाठी ८० रुपये मोजावे लागत आहेत.

‘गावठी’ अंड्यांचे भाव १२ ते १५ रुपयांवर आहेत. भाज्यांच्या चढत्या दराने शाकाहारींची जमा-खर्चाशी तोंडमिळवणी सुरू असतानाच, मांसाहारींना प्रिय असलेले अंडे ऐन पावसाळ्यात महागले आहे. होलसेल विक्रीचा शेकडा दर ५३० रुपये झाला आहे. यामुळे रिटेल बाजारात अंड्यांच्या दरात सुधारणा झाली आहे.

गेल्या वर्षी जानेवारीत होलसेल भावात एका अंड्याची किंमत चार रुपये होती. यात चढ-उतार होत डिसेंबरमध्ये अंड्याने किरकोळ बाजारात पाच रुपयांची मजल गाठली होती. आता उन्हाळा संपताच अंड्यांच्या उत्पादनात घट होत आहे. परिणामी, बाजारात मागणी वाढू लागल्याने दरही सुधारत आहेत. होलसेल दरात सुधारणा होऊ लागली की त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवर देखील होतो. महिन्यापूर्वी आठवड्यात ६ रुपयांवर स्थिरावलेल्या अंड्याने साडेसहा ते सात रुपयांचा दर गाठला आहे.

अंड्यांची आवक कमी आणि मागणी वाढलेली आहे. उन्हाळ्यात उत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा अंड्यांच्या दरात किंचितशी सुधारणा होण्याची शक्‍यता आहे. कोरोना काळात स्वस्तात सर्वाधिक प्रोटीनयुक्त म्हणून अंड्यांकडे पाहिले जात आहे.
सोहेल बशिर खान, संचालक, सुविधा एग्ज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT