Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : अमेरिकेतील दुष्काळी स्थितीचा सोयाबीन बाजाराला टेकू!

Soybean Rate : ब्राझीलच्या विक्रमी सोयाबीन उत्पादनानंतर आंतरराष्ट्रीय बाजार दोन महिन्यांपासून निचांकी पातळीवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात दबावातच राहील, अशी शक्यता असताना मागील आठवड्यात बाजार सुधारला.

Team Agrowon

Soybean production : ब्राझीलच्या विक्रमी सोयाबीन उत्पादनानंतर आंतरराष्ट्रीय बाजार दोन महिन्यांपासून निचांकी पातळीवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात दबावातच राहील, अशी शक्यता असताना मागील आठवड्यात बाजार सुधारला.

अमेरिकेत पेरणी आटोपली, पण पावसानं दडी दिली. पिकाला पाण्याची गरज असताना पाऊस नाही, उष्णता वाढली यामुळे बाजारात सुधारणा झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यापासून सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. दरवाढीला आधार मिळाला तो कमी पावसामुळे. यंदा अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढून उत्पादनही जास्त होईल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच युएसडीएने व्यक्त केला होता.

पण सोयाबीनची लागवड पुढे सरकत असताना पावसाची उघडीप वाढत गेली. यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली. अमेरिकेत आता पेरणी संपली. पण पावसाची अनेक भागातील दडी कायम आहे. मध्यपश्चिम अमेरिकेत पिकाला बसणारा फटका जास्त आहे.

ऐन पीक उगवणीच्या काळात पाऊस नसल्याने उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे शेतकरी आणि काही बाजार विश्लेषक सांगत आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाने याबाबत अद्याप काहीही अंदाज दिला नाही. सोयाबीन उत्पादनात यंदा २० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते, असे काही शेतकऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त अमेरिकेतील वाहिन्यांनी दिले.

यंदा एल निनो स्थिती आहे. एरवी एल निनो असताना अमेरिकेत चांगला पाऊस पडत असतो. तापमान कमी असते. पण यंदा पावसाला उशीर होत आहे. तापमान जास्त आहे. उष्णतेमुळे पिकाला फटका बसत आहे.

अमेरिकेतील मध्यपश्चिम भागात पिकाला पाण्याचा जास्त ताण बसत आहे. मध्य पश्चिम अमेरिकेतील इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगन या राज्यांमधील पिकाला पावसाची गरज आहे. या भागातील उत्पादकता यंदा कमी राहू शकते, असे येथील शेतकरी सांगत आहेत.

अमेरिकेत पाऊस कमी असल्याने शिकागो बोर्ड ट्रेड अर्थात सीबाॅटवर सोयाबीन वायद्यांमध्ये सुधारणा झाली. सोयाबीनचे भाव मे महिन्यात दोन वर्षातील निचांकी पातळीवर होते. त्यात आता जवळपास एक डाॅलरची वाढ झाली. म्हणजेच वायदे जवळापास १० टक्क्यांनी वाढले.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.७० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्येही वाढ झाली. सोयाबीनचे वायदे आज ४१७ डाॅलर प्रतिटनांवर होते.

एल निनो स्थितीमुळे यंदा अमेरिकेत चांगल्या पावसाची शक्यता होती. त्यामुळे विक्रमी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज होता. पण झालं उलटं. पावसाने दडी दिली. सध्या अमेरिकेतील सोयाबीन बाजाराचे लक्ष पावसाकडे लागून आहे. पावसाने आणखी काही दिवस दडी दिली, तर दरात आणखी सुधारणा होऊ शकते. पण चांगला पाऊस झाल्यास तेजी विरू शकते, असा अंदाज येथील बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT