Onion  Agrowon
ॲग्रोमनी

Onion : देशात कांदा लागवडीत घट

देशात कांद्याचा खरिप हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात असतो. तर लेट खरिप जानेवारी ते मार्च आणि रबी हंगाम मार्च ते जून या काळात असतो. मात्र कांदा लागवडीला नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणेः देशात जून महिन्यात दडी दिलेल्या पावसाने जुलैमध्ये धुमाकूळ घातला. त्यातच मागील हंगामात कांद्याला अपेक्षित दर (Onion Rate) मिळाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यातील कांदा लागवडीवर (Onion Cultivation) परिणाम होत आहे. शेतकरी कांद्याऐवजी कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean) आणि मुगाची लागवड करत असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

देशात कांद्याचा खरिप हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात असतो. तर लेट खरिप जानेवारी ते मार्च आणि रबी हंगाम मार्च ते जून या काळात असतो. मात्र कांदा लागवडीला नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. राज्यातील आगाप खरिप कांदा उत्पादनावरही परिणाम झाला. देशातील एकूण कांदा उत्पादनात ३३ टक्के वाटा या हंगामातील कांद्याचा असतो. पण जून महिन्यात कमी झालेला पाऊस आणि जुलैत अति पावसाने पिकाचे नुकसान केले. जुलै महिन्यात मुसळधार पावसाने कांदा रोपवाटीकांचे नुकसाने केले. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीत अडचणी येत आहेत. मागील हंगामात कांद्याचे नुकसान झाले. तसेच दरही कमी मिळाला. त्यातलनेत सोयाबीन आणि कापसाला चांगला दर होता. त्यामुळे राज्यातील शेतकरी यंदा कापूस आणि सोयाबीनला प्राधान्य देत आहेत.

कर्नाटकातही कांदा लागवड जवळपास २० टक्क्यांनी घटली. कर्नाटकात कांद्याखाली सरासरी दीड लाख हेक्टर क्षेत्र असते. पण मागील हंगामात मिळालेला कमी दर तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणारा अवकाळी पाऊस, यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. मागील दोन वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पादन मिळाले. यंदाही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी कापूस आणि मूग या पिकांकडे वळत आहेत. उत्तर कर्नाटकात २० ते २५ टक्के कांद्याखालील क्षेत्र कमी होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.

गुजरातमध्येही मागील वर्षी अवकाळी पावसामुळं कांदा पिकाचं उत्पादन घटलं होतं. उत्पादन घटूनही शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे यंदा शेतकरी कांदा लागवडी कमी करण्याची शक्यता आहे. शेतकरी कापसासारख्या पिकाला प्राधान्य देत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. कारण मागणी हंगामात कापसाला चांगला दर मिळाला होता. त्यामुळे गुजरातमध्ये गेल्यावर्षीपेक्षा कांदा बियाण्याची मागणी ३० टक्क्यांनी कमी आहे. कांदा लागवडीच्या काळात मागणी वाढू शकते, पण यंदा मागणी कमीच राहील, असा अंदाज बियाणे उद्योगाने व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT