Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : वायदे बाजारात कापूस दर नरमले !

कापसाचे वायदे आज आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही नरमले होते. प्रत्यक्ष कापूस खरेदीचे दर मात्र कायम होते.

Anil Jadhao 

Pune News : वायदेबाजारात आज कापसाचे दर (Cotton Rate) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी नरमले होते. देशातील वायद्यांमध्ये आज कापसाचे भाव (Cotton Bajarbhav) जवळपास ४५० रुपयांनी कमी झाले होते.

तर बाजार समित्यांमधील आवक वाढली होती. बाजारात आज १ लाख ५० हजार गाठींची आवक झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. कापसाची भावपातळी मात्र आजही कायम होती.

कापसाचे वायदे आज आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) आणि देशातही नरमले होते. प्रत्यक्ष कापूस खरेदीचे दर (kapus Dar) मात्र कायम होते. इतर राज्यांतील दराचा विचार करता किमान दर आजही ७ हजार रुपयांपासून सुरु झाले.

गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये ८ हजार ६०० रुपयांपेक्षा जास्त होते. गुजरातमधील कमाल भाव ८ हजार ९०० रुपये, कर्नाटकात ८ हजार ७०० रुपये आणि राजस्थानमध्ये ८ हजार ६०० रुपये कमाल भाव मिळाला. सध्या कमाल बाजारभावाच्या पावत्या फिरत आहेत. मात्र हा भाव सरकट नव्हता.

आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. महाराष्ट्रातील दरही याचदरम्यान कायम होता. राज्यातील काही बाजारांमध्ये आजही ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान कमाल दर मिळाला. हा दर मोजक्याच ठिकाणी होता.

देशातील वायदेही कमी झाले

वायद्यांचा विचार करता, आज एमसीएक्सवरील एप्रिल डिलिवरीच्या वायद्यांमध्ये आज ४६० रुपयांची नरमाई आली. वायदे ६३ हजार ७६० रुपयांवर होते. तर जूनच्या वायद्यांमध्येही ३८० रुपयांची घट झाली. जूनचे वायदे ६३ हजार ७६० रुपयांवर होते.

सोमवारी वायदे सुरु झाल्यानंतर तीन दिवस वाढ दिसली. मात्र गुरुवारपासून दरात नरमाई दिसली. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटीही सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वायद्यांमधील नरमाई कायम होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदेही नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे नरमले होते. आयसीईवरील वायदे आज ८०.६६ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये हा दर अनेक दिवसांनी पाहायला मिळाला.

तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचे दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स ९८.२५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. इंडेक्समध्ये जवळपास २.६० सेंटची नरमाई दिसून आली.

दर टिकून राहतील

देशातील कापूस उत्पादन घटल्याचं विविध संघटनांनी जाहीर केलं. कापसाचा वापरही वाढतोय. त्यामुळं कापसाच्या दरात सुधारणा झाली.

पुढील काळातही बाजारातील परिस्थितीनुसार दरात चढ उतार होतील. पण सध्याची दरपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

SCROLL FOR NEXT