Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market Rate : कापसाला कोणत्या बाजारात मिळाला ८ हजारांचा भाव?

Cotton Rate : देशातील बाजारात कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसत आहे. मागील आठ दिवसांमध्ये कापसाची सरासरी दरपातळी सुधारलेली दिसते.

Anil Jadhao 

Cotton Rate Update : देशातील बाजारात कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसत आहे. मागील आठ दिवसांमध्ये कापसाची सरासरी दरपातळी सुधारलेली दिसते. तर आवकही कमी झाली. आज काही बाजारांमध्ये कापसाला कमाल ८ हजारांचा भाव मिळाला होता. तर कापसाची सरासरी दरपातळी ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती.

देशातील बाजारात कापूस दरात मागील आठवड्यापासून सुधारणा दिसत आहे. बाजारातील कापसाची आवक आता कमी झाली. मे महिन्यात कापूस आवक एक लाख गाठींपेक्षा अधिक राहिली. याचा दबाव दरावर आला होता. परिणामी कापसाच्या भावाने हंगामातील निचांकी दर गाठला.

अनेक बाजारात कमाल भाव ७ हजारांपेक्षा कमी झाले होते. खरिपातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कापसाची विक्री करत होते. दर कमी झाले तरी कापूस येत असल्याने व्यापारी आणि उद्योगांनी कापसाचे भाव आणखी पाडले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.

आता शेतकऱ्यांची खरिपाची गरज जवळपास भागली. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. आता खूपच कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. कापसाचे भाव मे महिन्यात कमी असताना अनेक शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग केले. आता कापूस कमी आहे.

तसेच भाव वाढल्याशिवाय हे शेतकरी कापूस बाहेर काढण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे भाव वाढत असल्याचे व्यापारी आणि जाणकारांनी सांगितले.

मे महिन्यात १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होती. ती आता ७० ते ७५ हजारांवर आली. कापसाची आवक सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे दरातही सुधारणा पाहायला मिळते.

६ हजारांवर गेलेले कापसाचा किमान भाव आता ७ हजारांवर पोचला. तर कमाल भावाने काही बाजारांमध्ये ८ हजारांचा टप्पा गाठला. आज अकोट बाजारात कापसाला कमाल भाव ८ हजार १४० रुपये मिळाल्याची माहिती आहे. अर्थातच हा भाव सर्वच मालाला मिळाला नाही. लांब धाग्याच्या गुणवत्तापूर्ण कापासाल हा भाव मिळाला.

यापुढील काळात कापसाची आवक आणखी कमी होत जाणार आहे. तसेच आता जास्त दिवस थांबू शकतील अशाच अगदी थोड्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. हे शेतकरी सध्याच्या भावात कापूस विकण्याची शक्यता खूपच कमी आहे.

त्यामुळे दरात आणखी सुधारणा दिसू शकते. तसेच यंदा पावसाचे प्रमाण कसे राहते आणि कापूस लागवड किती होते? यावरच कापसाचे भाव अवलंबून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT