Wheat Export Agrowon
ॲग्रोमनी

Wheat Export : सोळा लाख टन गहू निर्यातीचा मार्ग मोकळा

निर्यातबंदी केल्यानंतर लेटर ऑफ क्रेडिट मिळालेले निर्यातदार सरकारच्या परवानगीची वाट वाहत होते. सरकारने आता १६ लाख टन गव्हाला निर्यातीसाठी नोंदणी प्रमाणपत्र दिले.

टीम ॲग्रोवन

पुणे ः निर्यातबंदी (Wheat Export Ban) केल्यानंतर लेटर ऑफ क्रेडिट (Letter OF Credit For Wheat Export) मिळालेले निर्यातदार सरकारच्या परवानगीची वाट वाहत होते. सरकारने आता १६ लाख टन गव्हाला निर्यातीसाठी (Wheat Export) नोंदणी प्रमाणपत्र दिले. म्हणजेच बंदरांवर अडकलेल्या १६ लाख टन गव्हाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला.

भारत गहू उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि गुजरात ही मुख्य गहू उत्पादक राज्ये आहेत. जगातील एकूण उत्पादनापैकी भारत १४ टक्के उत्पादन करतो. देशात सरासरी १ हजार ७५ लाख टन गहू उत्पादन होते; मात्र जागतिक गहू निर्यातीतील भारताचा वाटा केवळ एक टक्का आहे; मात्र २०२१-२२ या वर्षात देशातून निर्यात वाढली. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात गव्हाचा पुरवठा घटला. कारण या दोन्ही देशांतून जगाला जवळपास ४० टक्के गव्हाचा पुरवठा होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाची टंचाई निर्माण होऊन दरात वाढ झाली. याचवेळी भारतात नवीन गहू बाजारात आला. परिणामी, गव्हाची खरेदी वाढून देशातही दरवाढ झाली.

दुसरीकडे उष्णतेमुळे उत्पादन घटले. खुल्या बाजारात दर वाढल्याने सरकारची खरेदीही कमी झाली. दोन वेळा खरेदीचे उद्दिष्ट कमी करूनही ते गाठता आले नाही. गेल्या वर्षीपेक्षा सरकारी खरेदी निम्म्यापेक्षाही कमी राहिली. गहू बाजारातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच सरकारने १३ मे रोजी निर्यातबंदी केली; मात्र १३ मेच्या आधी निर्यातीसाठी लेटर्स ऑफ क्रेडिट मिळालेल्या गव्हाची निर्यात होईल, असे सरकारने जाहीर केले होते. तर दोन दिवसांपूर्वी २० लाख टन गहू निर्यातीला परवानगी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु विदेश व्यापार महासंचालनालयाने १६ लाख टन गव्हाच्या निर्यातीसाठी नोंदणी प्रमाणपत्र दिले. लेटर ऑफ क्रेडिट असलेल्या निर्यातदारांनी नोंदणी प्रमाणपत्रासाठी विदेश व्यापार महासंचालनालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

भारताने २०२१-२२ मध्ये ७० लाख टन गहू निर्यात केला. यापैकी तब्बल ५० टक्के निर्यात बांगलादेशला केली. यासोबतच नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, येमेन, अफगाणिस्तान, कतार, इंडोनेशिया, ओमान आणि मलेशिया या देशांनाही भारताने निर्यात केली. तर रशियाची निर्यातही आता सुरू झाली आहे. रशिया टर्किमार्गे गहू निर्यात करतोय. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारातही गव्हाचे दर स्थिर झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT