Banana  Agrowon
ॲग्रोमनी

केळी दरात सुधारणा सुरूच

निर्यातक्षम किंवा परदेशात निर्यातीच्या केळीला २२०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहे. रावेर, जळगाव बाजार समितीतर्फे १९५० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर केळीला जाहीर केला जात आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात केळी दरात (Banana Rate) सुधारणा सुरूच आहे. दरात मागील महिनाभरापासून सतत वाढ झाली असून, सध्या १९५० ते कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीला आहे.

निर्यातक्षम किंवा परदेशात निर्यातीच्या केळीला (Export Quality Banana) २२०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहे. रावेर, जळगाव बाजार समितीतर्फे (Jalgaon APMC) १९५० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर केळीला जाहीर केला जात आहे. केळीची आवक (Banana Arrival) जिल्ह्यात अत्यल्प किंवा हवी तेवढी नाही. यातच मागणी चांगली आहे. उत्तरेकडे दिल्ली, पंजाब, काश्मिर, उत्तर प्रदेशातील मॉल्समध्ये दर्जेदार केळीला उठाव आहे. तेथे चोपडा, फैजपूर (ता. यावल) व सावदा (ता. रावेर) येथील एजंट केळीची पाठवणूक करीत आहेत.

१६ किलोच्या कोरोगेटेड बॉक्समध्ये पॅकिंग करून केळीची पाठवणूक सुरू आहे. तसेच आखातातही केळीची निर्यात सुरू आहे. तीन कंपन्या केळीची आखातात निर्यात करीत आहेत. त्यासाठी फिल्ड पॅकिंग केली जात आहे. १३ किलोच्या कोरोगेटेड बॉक्समध्ये परदेशात निर्यातीच्या केळीची पॅकिंग केली जात आहे. केळीची आवक सध्या १३० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढीच आहे. आवक कमी व मागणी अधिक आहे. याशिवाय राज्यासह राजस्थान, छत्तीसगड आदी भागातही केळीला मागणी आहे. कमी दर्जाच्या केळीलाही चांगले किंवा १४०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहेत. आखातात जळगाव जिल्ह्यातून सध्या रोज चार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे. विक्रमी दरही परदेशात निर्यातीच्या केळीला मागील आठवड्यात मिळाले आहेत.

आखातासह उत्तरेकडे मागणी

मागील हंगामात कोविडचे काहीसे संकट होतेच. शिवाय केळीची आवक प्रतिदिन १८० ते २०० ट्रकपेक्षा अधिक होती. परंतु मागील वर्षी जून व जुलैमध्ये लागवडीच्या केळी पिकात कुकुंभर मोसॅक विषाणूचा प्रकोप झाला. यात केळीचे मोठे नुकसान रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर आदी भागात झाले. परिणामी सध्या केळीची आवक कमी आहे. कोविडचे संकट बाजारातून दूर झाले आहे. दुसरीकडे उष्णतेमुळे केळीला आखातासह उत्तरेकडे मागणी आहे. यामुळे दरात सतत सुधारणा झाली व उठाव टिकून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT