पाम तेल
पाम तेल 
ॲग्रोमनी

इंडोनेशियातून भारतात पामतेल निर्यातीत घटीची शक्यता

कोजेन्सिस वृत्तसेवा

मुंबई ः पामतेलाच्या निर्यातीत इंडोनेशिया जगात अाघाडीवर अाहे. तर भारत हा पामतेलाचा प्रमुख खरेदीदार देश अाहे. यंदा (२०१७) इंडोनेशियातून भारतात ५.७ दशलक्ष टन पामतेल निर्यात होईल, असा अंदाज इंडोनेशिया पामतेल संघटनेचे प्रमुख जोको सुप्रियोनो यांनी व्यक्त केला अाहे.

हल्लीच भारत सरकारने पामतेल अायातीवरील शुल्क वाढविले अाहे. याचा काही प्रमाणात परिणाम इंडोनेशियातून भारतात होणाऱ्या पामतेल निर्यातीवर होणार अाहे, असेही त्यांनी नमूद केले अाहे.

‘‘भारताने पामतेलावरील अायात शुल्क वाढविण्याअगोदर इंडोनेशियातून पामतेलाची निर्यात चांगली होती. अाम्हाला अधिक निर्यात अपेक्षित अाहे. मात्र, भारताने केलेल्या अायात शुल्कवाढीचा काही प्रमाणात परिणाम निर्यातीवर होईल,’’ असे सुप्रियोनो यांनी म्हटले अाहे.

गेल्या जानेवारी-जूनदरम्यान इंडोनेशियाने भारतात ३.४ दशलक्ष टन पामतेल निर्यात केली अाहे. मात्र त्यानंतर अाॅगस्टमध्ये भारताने पामतेल अायात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढविले. यामुळे पुढील काही दिवसांत निर्यात कमी होणार असल्याचे संकेत मिळत अाहेत. इंडोनेशियातील पामतेल उत्पादनात वाढ इंडोनेशियातील पामतेल उत्पादन यंदा ३५.५ दशलक्ष टनांवर पोचण्याचा अंदाज अाहे. याअाधीच्या वर्षी (२०१६) पामतेल उत्पादन ३२.५ दशलक्ष टन झाले होते. इंडोनेशियातून भारतात मोठ्या प्रमाणात पामतेल निर्यात केली जाते. ...त्यांना भारतातील ग्राहकांची चिंता भारतातील शेतकरीहिताच्या दृष्टिकोनातून पामतेलावरील अायात शुल्क केंद्र सरकारने वाढविले. या निर्णयामुळे इंडोनेशियातील तेल उत्पादक संघटनांनी अागपाखड केली. पामतेलावरील अायात शुल्क वाढविल्याचा फटका भारतातील ग्राहकांना बसणार असून, चलनवाढीचा दरही वाढणार अाहे, अशी प्रतिक्रिया इंडोनेशिया पामतेल संघटनेचे सरचिटणीस फदील हसन यांनी व्यक्त केली अाहे. भारत हा इंडोनेशियातून होणाऱ्या पामतेल निर्यातीवर अवलंबून अाहे. मात्र, भारताच्या अायात शुल्कवाढीच्या निर्णयाचा इंडोनेशियातील पामतेल निर्यातीवर परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी भारताने अायात शुल्कवाढीचा निर्णय सक्तीने घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले अाहे.

भारतात परदेशांतून केलेली पामतेल अायात (दशलक्ष टनांमध्ये)

  • वर्ष...पामतेल
  • २०१२-१३...८.४
  • २०१३-१४...७.६
  • २०१४-१५...८.१
  • २०१५-१६...९.६
  • २०१६-१७ (एप्रिल- डिसेंबर)...६.१
  • - स्रोत - केंद्रीय वाणिज्य विभाग

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

    Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

    Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

    Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

    Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

    SCROLL FOR NEXT