काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची चिन्हे
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची चिन्हे 
ॲग्रोमनी

काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची चिन्हे

Manoj Kapade

पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन स्थितीत देशाच्या आॅटोमोबाईल सेक्टरचे कंबरडे मोडले असले तरी मजूर टंचाईमुळे शेतीतील काढणी व मळणी यंत्रे (हार्वेस्टर) बनवणाऱ्या उद्योगामध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत. देशाच्या कृषी क्षेत्रात मजुरांची मोठी टंचाई जाणवत असून ही स्थिती पुढील हंगामात देखील राहील. त्यामुळे शेतीशी निगडीत मोठया संस्था, कंपन्या, सहकारी संस्था, कारखाने, शेतकरी कंपन्या आणि कंत्राटी शेतीमधील घटक यांत्रिकीकरणाच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती हार्वेस्टिंग उद्योगातील सूत्रांनी दिली.   साखर कारखान्यांना ऊसतोडणीसाठी मोठया प्रमाणात मजूर वर्ग लागतो. चालू हंगामात लागवडी चांगल्या झाल्या असली तरी भविष्यात तोडणीसाठी मजूर वेळेवर उपलब्ध होतील की नाही याची शाश्वती महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमधील साखर उद्योगाला वाटत नाही. त्यामुळे या उद्योगातून हार्वेस्टरला मागणी वाढली आहे. “देशात ऊसतोडणीसाठी शक्तिमान आणि न्यू हॉलंड अशा दोन मोठया कंपन्यांकडून कारखान्यांना हार्वेस्टर पुरविले जातात. न्यू हॉलंडने २०१८ मध्ये १२५ हार्वेस्टर दिले होते. यंदा दोन्ही कंपन्या ६०० हार्वेस्टर देण्याची चिन्हे आहेत,” अशी माहिती कंपनी सूत्रांनी दिली.  महाराष्ट्रात किमान यंदा २०० हार्वेस्टर वाढण्याची शक्यता आहे. संयुक्त काढणी-मळणी यंत्रे (कंबाईन हार्वेस्टर) निर्मितीसाठी पंजाबमधील कारखाने प्रसिध्द आहेत. यंदा बाजारपेठेत २००० कंबाईन हार्वेस्टरना मागणी राहील. त्यापैकी १२५ महाराष्ट्रात येण्याची चिन्हे आहेत. “न्यू हॉलंड कंपनीचे कंबाईन हार्वेस्टर १७ प्रकारच्या पिकांची कापणी करतात. त्याची किंमत २५ लाख रुपये असून यंदा आम्हाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळू शकतो. तसेच, केनहार्वेस्टरची किंमत एक कोटी रुपये असून देखील मागणी वाढलेली आहे. त्यामुळे कंपन्यांचे सर्व प्रकल्प जादा क्षमतेने चालण्याची चिन्हे आहेत,” अशी माहिती न्यू हॉलंडच्या सूत्रांनी दिली.   दुसऱ्या बाजूला भात, गहू किंवा इतर पिकांची काढणी झाल्यानंतर उरलेल्या काडाचे, गवताचे भारे बांधणाऱ्या बेलर यंत्राला देखील मागणी वाढली आहे. यंदा बेलरच्या मागणीत दुप्पट वाढ होण्याचा अंदाज बेलर उत्पादक कंपन्यांचा आहे. काढणी व मळणीची कामे करणाऱ्या यंत्रांना महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक भागात मागणी राहील. याशिवाय कृषी आधारित यंत्र सामुग्रीचे इतर उत्पादक, सुटे भाग तयार करणारे छोटे उद्योजक, दुरूस्ती व सेवा देणारे व्यावसायिक यांच्यासाठी चित्र आशादायक आहे, असेही हार्वेस्टिंग उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. प्रतिक्रिया... कृषी उद्योगातील हार्वेस्टिंग मशिनरींना याआधीच्या तुलनेत चांगली मागणी आहे. शेतीशी निगडीत सर्व उद्योगांचे महत्व लॉकडाउनमध्ये लक्षात आलेले आहे. दिवाळीच्या आधी कोविड १९ ची तीव्रता कमी झाल्यास यंदाची दिवाळी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर  उद्योगांसाठी तेजी आणणारी राहू शकते. — परेश प्रधान, प्रादेशिक सेवा व्यवस्थापक, न्यू हॉलंड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT