Indian Agriculture Agrowon
ॲग्रोमनी

कृषी क्षेत्राने दिला अतिरिक्त १ कोटी लोकांना रोजगार!

सीएमआयईच्या (CMIE) पाहणीनुसार, २०२०-२०२१ या कोरोना महामारीच्या काळात एकूण २१ कोटी ७० लाख लोकांचे रोजगार गेले असताना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने साडे चार कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कृषी क्षेत्राने यावर्षी अतिरिक्त ३४ लाख लोकांना सामावून घेतले होते.

Team Agrowon

कोरोना महामारीच्या काळात इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी क्षेत्राची (Agriculture)कामगिरी समाधानकारक राहिली आहे. गेल्या तीन वर्षांत इतर क्षेत्रातील दीड कोटी लोकांचे रोजगार (Employment) कमी झाले असताना या कालावधीत कृषी क्षेत्राने अतिरिक्त १ कोटी १० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) पाहणीत ही आकडेवारी समोर आली आहे. सीएमआयईच्या (CMIE) पाहणीनुसार, २०२०-२०२१ या कोरोना महामारीच्या काळात एकूण २१ कोटी ७० लाख लोकांचे रोजगार गेले असताना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने (Agriculture) साडे चार कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कृषी क्षेत्राने यावर्षी अतिरिक्त ३४ लाख लोकांना सामावून घेतले होते.

२०१९-२०२० या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने अतिरिक्त अशा ३१ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. समाधानकारक मॉन्सून, वाढीव उत्पादन आणि रास्त दरांमुळे कृषी क्षेत्राला या अधिकच्या लोकांना सामावून घेणे शक्य झाले असल्याचे सीएमआयईने (CMIE) म्हटले आहे.

या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या वाढत्या उत्पादनाचे (Bumper Crops) चांगले मोल मिळाले असून व्यापारातूनही चांगला लाभ मिळाला असल्याचे परिणाम म्हणून कृषी क्षेत्रात अधिकच्या लोकांना रोजगार देण्याची क्षमता निर्माण झाल्याचेही सीएमआयइचे (CMIE) म्हणणे आहे.

२०२९-२०२० या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रात ५. ५ टक्क्यांची वाढ झाली तर बिगर कृषी क्षेत्रांची वाढ ३. ५ टक्क्यांनी झाली. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची (Agriculture) वाढ ३.३ टक्क्यांनी झाली तर बिगर कृषी क्षेत्रात अर्थकारण ६.३ टक्क्यांनी आकसल्याचे पाहायला मिळाले आहे.

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षात इतर क्षेत्र घसरण रोखण्याचा कसाबसा प्रयत्न करत असतानाही कृषी क्षेत्राने (Agriculture) ३.३ टक्क्यांनी संथ पण स्थिर वाटचाल सुरू असल्याचे सीएमआयईने (CMIE) नमूद केले आहे. यामुळेच इतर व्यावसायिक समूहाच्या तुलनेत शेतकरी समूहात ग्राहक निर्देशांकात थोडीशी सुधारणा दिसून आल्याचा उल्लेख सीएमआयईने (CMIE) केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT