साखर दर
साखर दर 
ॲग्रोमनी

साखरेचा दर पोचला ३६०० वर

Raj Chougule

कोल्हापूर : गेल्या चार ते पाच महिन्यांत साखरेचे दर वाढून प्रतिक्विंटल ३६०० रुपयांच्यावर गेल्याने यंदाच्या साखर हंगामाच्या पार्श्वभूमीवर समाधानाचे वातावरण आहे. याचा सकारात्मक परिणाम उसाच्या पहिल्या हप्त्यावर होण्याची शक्यता आहे.  यंदाच्या एफआरपीमध्ये क्विंटलला २५ रुपयांनी वाढ केंद्राने केली आहे. म्हणजेच साडे बारा रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांना पहिल्या हप्त्यापोटी गेल्यावर्षी पेक्षा टनाला ३० ते ३५ रुपये जादा द्यावे लागतील. अवर्षण व रोगकिडीमुळे हबकलेल्या ऊस उत्पादकाला हंगामाच्या सुरवातीला तरी दिलासादायक परिस्थिती आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत २०० रुपयांनी वाढ  यंदा पाऊस नसल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मुळेच भविष्यात साखर कमी मिळेल या शक्यतेने सध्या किमती वाढत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचा दर क्विंटलला सरासरी २०० रुपयांनी वाढला आहे. राज्य बँकेने मूल्यांकन वाढवले साखरेचे वाढते दर पाहून राज्य बँकेने ही साखरेचे मूल्यांकन वाढवले आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत बँकेने साखरेचे मूल्यांकन ३५०० रुपये इतके केले आहे. मूल्यांकनाच्या तुलनेत ८५ टक्केपर्यंते कर्जपुरवठा बँकेकडून होत असल्याने त्याचा फायदा कारखान्यांना निधी उपलब्ध करताना होईल असा अंदाज कारखाना वर्तुळांतून व्यक्त होत आहे. कारखान्यांना भीती केंद्राच्या धोरणाची साखर दराबाबत काही कारखाना प्रतिनिधींशी संपर्क साधला असता  साखरेचे दर वाढल्याने साखर दराबाबतीत थोडी बरी स्थिती असल्याचे सांगितले. परंतु, केंद्राने साखर भाव वाढ नियंत्रित करण्यासाठी काही विरोधी निर्णय घेतले तर मात्र उद्योग अडचणीत येईल, अशी शक्यता कारखान्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT