Bajara Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bajara Rate : खानदेशात बाजरीची आवक वाढल्याने दरात किंचित घट

Bajara Market : खानदेशात मागील काही पाच दिवसांत बाजरीच्या आवकेत सतत वाढ झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात मागील काही पाच दिवसांत बाजरीच्या आवकेत सतत वाढ झाली आहे. प्रमुख बाजार समित्यांत मिळून सध्या एक हजार क्विंटल बाजरीची आवक रोज होत आहे. दरातही किंचित घट दिसत आहे.

बाजरीचे कमाल दर २१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर किमान दर १७५० रुपये आहेत. मध्यंतरी किमान दर १८०० रुपयांपर्यंत होते. तर कमाल दरही २२०० रुपयांवर होते. आवक वाढल्याने दरातही घट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सध्या सर्वाधिक आवक जळगाव जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव व अमळनेर या बाजारांत बाजरीची आवक अधिक आहे. चाळीसगाव भागात रोज १०० ते १५० क्विंटल बाजरी येत आहे.

चोपडा बाजार समितीतही मागील दोन दिवस प्रतिदिन सरासरी २० क्विंटल बाजरीची आवक झाली आहे. तसेच धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील शहादा भागातही बाजरीची आवक आहे.

बाजरीची मळणी या महिन्यात सर्वत्र पूर्ण झाली आहे. यंदा पेरणी स्थिर होती. अनेकांनी चारा व धान्यासाठी पेरणी केली होती. तर केळी पट्टा किंवा तापी, अनेर नदीच्या क्षेत्रात बेवड म्हणून बाजरीची पेरणी झाली होती.

उत्पादनही यंदा बरे आहे. मळणी मागील महिन्याच्या अखेरीस सुरू झाली. काही भागांत पावसात पीक खराब झाले. पेरणी विविध टप्प्यांत झाल्याने मळणी या महिन्याच्या मध्यातही सुरू होती. जशी मळणी सुरू झाली, तशी बाजारातील आवकही मागील महिन्यात सुरू झाली. ती हळूहळू वाढली. पुढील आठवड्यात आवक कमी होऊ शकते, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT