Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : तुरीला मिळाला सव्वासात हजारांचा दर

नवीन तूर निघण्याचा काळ सुरू झाला. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या नव्या तुरीला सात हजार ३११ रुपये दर मिळाला.

Team Agrowon

वर्धा ः नवीन तूर निघण्याचा (Tur Harvesting) काळ सुरू झाला. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या नव्या तुरीला (Tur Rate) सात हजार ३११ रुपये दर मिळाला. बाजारात आतापर्यंत एकाच शेतकऱ्याचा शेतीमाल आल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ वर्धा बाजार समितीतच नवी तूर (Tur Arrival) आली असून इतर समितींत तुरीची कुठेच आवक झाली नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे तुरीवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. अनेकांच्या शेतात उभी तूर करपली. अनेक भागांत तुरीला फुलधारणाच झाली नसल्याने तूर उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले होते.

अनेक शेतकऱ्यांनी शेतातील तूर वेळेपूर्वीच काढल्याने तुरीचे उत्पादन घटणार असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत तुरीला उत्तम दर मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यात सुमारे ७० हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. यातून भरघोस उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. असे असले तरी तुरीवर आलेल्या रोगामुळे तसे झाले नाही.

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या तुरीची आवक झाली. प्रारंभीला तुरीला मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी त्याचा लाभ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

केवळ वर्ध्यातच आवक

शेतकऱ्यांच्या शेतात तूर नसल्याने नवी तूर अद्याप एकाही बाजार समितीत आली नाही. वर्ध्यात तूर येताच त्याच्या खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. यात तूर घेऊन आलेल्या डोर्ली येथील शेतकरी नीलेश परतेकी यांचा बाजार समितीचे सचिव समीर पेंडके यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्या प्रसंगी शेतकरी, अडते, व्यापारी व कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT