Parbhani News : जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांमध्ये कापसाच्या कमाल दरात गेल्या काही दिवसांत ५०० ते ७०० रुपयांनी सुधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा परत पल्लवित झाल्या आहेत.
शनिवारी (ता.३) मानवत बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान ५६०० ते कमाल ७५२० रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले.
सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७४५० रुपये, तर सरासरी ७३७० रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ७५७५ रुपये दर मिळाले.
परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांतील कापसाच्या दरात २३ मे पासून घसरण सुरु झाली होती. २५ मे पासून दर आणखीन कोसळले होते. किमान दर साडेपाच हजारांपेक्षा कमी तर कमाल दर सात हजार रुपयांपेक्षा कमी झाले होते.
२७ मे पासून दरात सुधारणा झाली आहे. कमाल दर परत सात हजारांवर गेले आहेत. किमान दर साडे पाच ते सहा हजार रुपयांच्या जवळपास आहेत.
सेलू बाजार समितीत गुरुवारी (ता.२) प्रतिक्विंटल किमान ६२०५ रुपये तर कमाल ७ हजार ५९० रुपये दर मिळाले. बुधवारी(ता.१) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७४५० रुपये तर सरासरी ७३९० रुपये दर मिळाले.
मानवत बाजार समितीत गुरुवारी (ता. २) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५७०० ते कमाल ७५२० रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५ हजार ५०० ते कमाल ७ हजार ४२५ रुपये तर सरासरी ७३०० रुपये दर मिळाले.
पहिल्या दोन वेचणीचा कापूस अजूनही शिल्ल्क
यंदा देखील कापसाला दहा हजारांहून अधिक दर मिळतील, अशी कापूस उत्पादकांना आशा होती. जानेवारी महिन्यानंतर दरात घसरण सुरु झाली. एप्रिल महिन्यात सुरुवातीचे काही दिवस दर आठ हजारांवर गेले होते. परंतु ते फार काळ टिकले नाहीत. मे महिन्यात कापसाला यंदाच्या हंगामातील नीचांकी दर मिळाले.
किमान दर सहा हजार रुपये तर कमाल दर सात हजार रुपयांहून कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापूस विक्री करणे पसंत केले. त्यामुळे आवक वाढली होती. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे पहिल्या दोन वेचणीचा दर्जेदार कापूस शिल्लक आहे. दरात सुधारणा होत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.