Jaggery Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market Price : कऱ्हाडला गूळ मुहूर्ताच्या सौद्यास ४१०० रुपये दर

Jaggery Market Rate : कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांच्या हस्ते गुळाच्या सौद्यास प्रारंभ झाला.

हेमंत पवार

Satara News : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्ड आवारात यंदाच्या हंगामातील पहिल्याच मुहूर्ताच्या सौद्यास सोमवारी (ता. १६) प्रति क्विंटल ४१०० दर मिळाला. तर सरासरी ३८०० ते ४१०० रुपये दर मिळाला. तर पहिल्याच दिवशी ११० क्विंटल गुळाची आवक झाली.

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांच्या हस्ते गुळाच्या सौद्यास प्रारंभ झाला. बाजार समितीचे संचालक जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड, गूळ व्यापारी देवेंद्र संगोई, तलकसी संगोई, केतन शहा, ओम गाला, शिवाप्पा खांडेकर, अशोक संसुद्दी व गूळ आडते शिवाजी पवार, अर्जुन पाटील, सर्जेराव पाटील, सुमित गांधी, रवी पाटील, सनी पाटील, अभिजित जाधव, राजेंद्र पवार, सागर पाटील आदी उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजयकुमार आणि कंपनी, मे. जे. बी. लावंड, मे. आर. आर. पाटील या गूळ आडत दुकानामध्ये गुळाचे सौदे झाले. पश्चिम सुपनेतील हंबीरराव गायकवाड आणि सांगली जिल्ह्यातील देववाडी येथील अधिकराव मोरे यांच्या गुळाला प्रति क्विंटल ४१०० दर मिळाला.

आजच्या गूळ सौद्यामध्ये सरासरी ३८०० ते ४१०० रुपये दर मिळाला. या वेळी गूळ उत्पादक शेतकऱ्यांचा सभापती कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांनी कऱ्हाड बाजार समितीत गूळ विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती कदम यांनी या वेळी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT