Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनचे ४ कोटी ७१ लाख रुपयांवर चुकारे अदा

Soybean Rate : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी व हिंगोली जिल्ह्यातील २० केंद्रांवर सोमवाररपर्यंत (ता. २५) १ हजार ३१९ शेतकऱ्यांचे २३ हजार ८४६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.

Team Agrowon

Parbhani News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी व हिंगोली जिल्ह्यातील २० केंद्रांवर सोमवाररपर्यंत (ता. २५) १ हजार ३१९ शेतकऱ्यांचे २३ हजार ८४६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.

आजवर या दोन जिल्ह्यांतील १२ केंद्रांअंतर्गतच्या ६२६ शेतकऱ्यांना ९ हजार ६३९ क्विंटल सोयाबीनचे ४ कोटी ७१ लाख ५६ हजार ४३४ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्यातर्फे १५ पासून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे.

परभणी, पेडगाव, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ९ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी सोमवारअखेर (ता. २५) ९ हजार १२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी जिंतूर वगळता इतर ८ केंद्रांवर ५४० शेतकऱ्यांचे ९ हजार ४५८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

या सोयाबीनची किंमत ४ कोटी ६२ लाख ७० हजार ४२९ रुपये होते. त्यापैकी ५ केंद्रांअंतर्गतच्या २७० शेतकऱ्यांना ३ हजार ८४५ क्विंटल सोयाबीनचे १ कोटी ८८ लाख १२ हजार १८६ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) अंतर्गत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा या १४ खरेदी केंद्रांवर सोमवारपर्यंत (ता. २५) ६ हजार ३५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT