Lemon Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Lemon Market Rate : नगरमध्ये लिंबाला ३००० ते ११००० रुपये दर

नगर येथील बाजार समितीत लिंबाची सध्या दररोज ३० ते ३५ क्विंटलपर्यत आवक होत आहे.

Team Agrowon

Lemon Market Rate नगर ः नगर येथील बाजार समितीत लिंबाची सध्या दररोज ३० ते ३५ क्विंटलपर्यत आवक (Lemon Arrival) होत आहे. उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी (Lemon Demand) वाढल्याने चांगला दर (Lemon Rate) मिळत आहे.

सध्या लिंबाला तीन हजारांपासून आकरा हजार रुपयांपर्यंत व सरासरी ७ हजार रुपये दर मिळत आहे. कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांत व्यापारी लिंबू खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावरही येऊ लागले आहेत.

नगर जिल्ह्यात कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, पारनेर, नगर तालुक्यांसह शेजारच्या आष्टी, पैठण भागांतही काही प्रमाणात लिंबाचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी उन्हाळ्यात दरात तेजी असते.

मागील वर्षी तर प्रती किलो २०० रुपयांपर्यंत लिंबाचे दर गेले होते. यंदाही उन्हाचा चटका वाढल्याने लिंबाला मागणी वाढली. सध्या नगर बाजारात ३५ क्विंटलपर्यंत आवक होत असली तरी श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातून पुणे, मुंबई व अन्य भागात मोठ्या प्रमाणात लिंबाची आवक होत आहे.

काही व्यापारी तर थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत. लिंबाला तीन हजारांपासून आकरा हजारांपर्यंत व सरासरी ७ हजारांचा दर मिळत आहे.

मागील आठवड्यात सहा हजार ते आकरा हजार रुपयांपर्यंत दर होता. मागील आठवड्यात लिंबाची दररोज सरासरी २० क्विंटलपर्यंत आवक होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT