Silk Cocoon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Cocoon Production: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत रेशीम कोष उत्पादनात ३० टन वाढ

Market Update: मागील आर्थिक (२०२४-२५) वर्षात परभणी जिल्ह्यात १८९.५४५ टन आणि हिंगोली जिल्ह्यात ६८.७७० टन मिळून एकूण २५८.३१५ टन रेशीम कोष उत्पादन मिळाले आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News: मागील आर्थिक (२०२४-२५) वर्षात परभणी जिल्ह्यात १८९.५४५ टन आणि हिंगोली जिल्ह्यात ६८.७७० टन मिळून एकूण २५८.३१५ टन रेशीम कोष उत्पादन मिळाले आहे. या दोन जिल्ह्यांतील रेशीम कोष उत्पादनात २०२३-२४ मधील २२८ टन कोष उत्पादनाच्या तुलनेत ३० टन वाढ झाली आहे.

परभणी जिल्ह्यात ३८७ शेतकऱ्यांकडे जुनी ४२४ एकर व नवीन १३० शेतकऱ्यांकडे १३० एकर मिळून एकूण ५१७ शेतकऱ्यांनी ५५४ एकरवर तुती लागवड केलेली आहे. मागील आर्थिक वर्षात या शेतकऱ्यांनी २ लाख ६७ हजार ९५० अंडीपुंजांपासून १८९.५४५ टन कोष उत्पादन घेतले. २०२३-२४ मध्ये ३ लाख ५ हजार अंडीपुंजांपासून १६७ टन रेशीम कोष उत्पादन निघाले होते. त्या तुलनेत २०२४-२५ मध्ये कोष उत्पादनात २२.५४ टन वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यामध्ये २७८ शेतकऱ्यांकडे २७८ एकरवर जुनी तुती लागवड, तर १५२ शेतकऱ्यांकडे १५२ एकर नवीन तुती लागवड आहे. जुनी-नवी मिळून ४२५ शेतकऱ्यांकडे ४३० एकर तुती लागवड आहे. जुन्या २५५ आणि नवीन ११० मिळून एकूण ३६५ शेतकऱ्यांनी एकूण १ लाख ३३ हजार २०० अंडीपुंजांपासून ६८.७७० टन रेशीम कोष उत्पादन घेतले.

जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये १ लाख १२ हजार ९५० अंडीपुंजांपासून ६१.१६३ टन कोष उत्पादन मिळाले होते. त्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ७.६०७ टन जास्त रेशीम कोष उत्पादन मिळाले, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे यांनी दिली.

तुती लागवड क्षेत्र कमी झाले असले तरी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे रेशीम कोष उत्पादन वाढले. उन्हाळ्यातही योग्य व्यवस्थापन करून अनेक शेतकरी दर्जेदार कोष उत्पादन घेत आहेत. चांगले बाजारभाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस मदत झाली आहे.
गोविंद कदम, जिल्हा रेशीम विकास अधिकारी,परभणी
रेशीम शेतीसाठी मनरेगाअंतर्गंत अनुदानात वाढ झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. अनेक जुने शेतकरी रेशीम कोष उत्पादनात कुशल झाले आहेत. त्यामुळे कोष उत्पादनात वाढ होत आहे.
प्रमोद देशपांडे

जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली

तुलनात्मक रेशीम कोष

उत्पादन स्थिती (टनामध्ये)

जिल्हा २०२२-२३ २०२३-२४ २०२४-२५

परभणी १४७ १६७ १८९

हिंगोली ५३ ६१ ६८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: मराठवाड्यात पाऊस, विदर्भात उष्णतेचा इशारा; मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणाला उकळी, गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरु, ठराव दाखल करण्याची तारीख ठरली

Water Scarcity: सांगलीत खानापूर तालुक्यात सहा गावांत पाणीटंचाई

Hatnur Dam Water Release: ‘हतनूर’मधून विसर्ग; अनेक गावांना दिलासा

Summer Crop Sowing: हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीत ६ हजार ७०२ हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT