Gold Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Market : सोने बाजारात २५ कोटींची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पर्वावर खरेदीसाठी ग्राहकांनी बुधवारी (ता. ५) मोठा उत्साह दाखविला.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा (Dussera Festival) पर्वावर खरेदीसाठी ग्राहकांनी बुधवारी (ता. ५) मोठा उत्साह दाखविला. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर बुधवारी निर्बंधमुक्त वातावरणात ग्राहकांनी खरेदीची (Gold Market) आनंद लुटला. एकट्या सुवर्णबाजारात ग्राहकांच्या खरेदीमुळे २५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, तरी खरेदीचा उत्साह नागरिकांमध्ये दांडगा होता. सकाळी दहापासूनच सोने, चांदीच्या दुकानांत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली.

विविध प्रकारचे दागिने बाजारात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आले होते. त्यांच्या खरेदीला प्रतिसाद मिळाला. सोने खरेदीसाठी मध्य प्रदेशसह बुलडाणा भागातील ग्राहकही जळगावात आले होते. सराफ बाजारात सायंकाळपर्यंत मोठी गर्दी होती.

विजयादशमीला काही वर्षांपूर्वी सोन्याचा तुकडा खरेदी केला जात असे. दोन-तीन वर्षांपासून सोन्याचे दागिने खरेदीकडे कल वाढला आहे. मंगळसूत्र, पोत, बांगड्या, अंगठी, नेकलेस आदी आकर्षक डिझाइनच्या दागिन्यांना मागणी होती.
मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT