Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Export : बारामतीतून १८० टन आंबा निर्यात

Mango Market : जळोची निर्यात सुविधेवरून हंगामात एप्रिलअखेर १८० टन आंबा लंडन व अमेरिका येथे निर्यात केल्याची माहिती सभापती विश्‍वासराव आटोळे यांनी दिली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Baramati News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी उभारलेल्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधा केंद्र बाजार समितीचे मार्गदर्शक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बाजार समिती चालवत आहे.

जळोची निर्यात सुविधेवरून हंगामात एप्रिलअखेर १८० टन आंबा लंडन व अमेरिका येथे निर्यात केल्याची माहिती सभापती विश्‍वासराव आटोळे यांनी दिली.

सुविधा केंद्रावरून रेन्बो इंटरनॅशनल प्रा. लि. पुणे यांच्या मार्फत दरवर्षी आंबा निर्यात केला जात असून ज्या शेतकऱ्यांकडे रेसिड्यू फ्री व निर्यातक्षम दर्जाचा आंबा असल्यास अशा शेतकऱ्यांनी रेन्बो इंटरनॅशनल यांच्याशी संपर्क साधून सुविधा केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन निर्यातदार अभिजित भसाळे यांनी केले आहे. बारामती बाजार समितीमार्फत जळोची निर्यात सुविधा केंद्र हे २०१४ पासून चालवीत आहे.

गतवर्षी याच सुविधा केंद्रावरून रेन्बो इंटरनॅशनल मार्फत ४८५ टन आंबा ऑस्ट्रेलिया, युरोप देशात निर्यात केला आहे. रेन्बो इंटरनॅशनलचे अभिजित भसाळे हे शेतकऱ्यांकडून निर्यातक्षम आंबा खरेदी करून आमगो बॅण्ड या नावाने आकर्षित पॅकिंग करून निर्यात करीत आहेत.

हंगामात एप्रिलपासून आतापर्यंत लंडन येथे ७५ टन तर १०५ टन अमेरिका, युरोप येथे निर्यात झाला. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी रेन्बो इंटरनॅशनलशी संपर्क साधून निर्यातक्षम मालाची विक्री करता येईल, असे सचिव अरविंद जगताप यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT