Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : सोयाबीन विक्रीचे संदेश न आल्याने दीड हजार शेतकरी वाऱ्यावर

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात किमान हमीदरानुसार सोयाबीनची विक्रीपूर्व नोंदणी १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. ही नोंदणी सहा जानेवारीपर्यंत सुरू होती.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : जिल्ह्यात किमान हमीदरानुसार १३ लाख ५४ हजार ६६२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. यासाठी नोंदणी केलेल्या ९२ हजार २१३ शेतकऱ्यांपैकी ९० हजार ६६४ शेतकऱ्यांना खरेदी संदर्भात संदेश आहेत. तर, अद्याप १५४९ शेतकऱ्यांना संदेश प्राप्त न झाल्याने हजारो क्विंटल सोयाबीन घरीच पडून राहिले आहेत.

नांदेड जिल्ह्यात किमान हमीदरानुसार सोयाबीनची विक्रीपूर्व नोंदणी १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. ही नोंदणी सहा जानेवारीपर्यंत सुरू होती. या काळात जिल्ह्यातील ९२ हजार २१३ शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नोंदणी केली. यानंतर जिल्ह्यात सोयाबीनचे खरेदी केंद्र १५ ऑक्टोबरपासून सुरू झाले.

सोयाबीनची ही खरेदी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन, दी विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशन, पृथाशक्ती एफपीओ, महाकिसान एफपीओ व महाकिसानवृद्धी या राज्यस्तरीय एजन्सींना देण्यात आली. या पाच एजन्सीकडून जिल्ह्यात ३५ पेक्षा अधिक खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी करण्यात आले.

ही खरेदी जिल्ह्याच्या विविध भागांत झाली. प्रारंभी शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नोंदणी तसेच खरेदीकडे पाठ फिरविली होती. परंतु बाजारात सोयाबीनचे दर घसरत गेल्यामुळे नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

तसेच सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर गर्दी होऊ लागली. शासनाने खरेदीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून प्रारंभी नोंदणीसाठी आणि त्यानंतर सोयाबीन खरेदीसाठी सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. खरेदी केंद्राकडून ९० हजार ६६४ शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री संदर्भात संदेश प्राप्त झाले.

या काळात जिल्ह्यात पाच एजन्सींच्या खरेदी केंद्रावर १३ लाख ५४ हजार ६६२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. परंतु १५४९ शेतकऱ्यांना मात्र संदेश प्राप्त झाले नाहीत. परिणामी, त्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन घरीच पडून राहिले आहेत. शासनाने मुदतवाढ दिली नसल्याने एकट्या नांदेड जिल्ह्यातील एक लाख तीन हजार ४९७ क्विंटल सोयाबीन खरेदीचे लक्षांक शिल्लक राहिले आहे.

मार्केटिंग फेडरेशनकडूनसर्वाधिक खरेदी

नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून २१ ठिकाणी सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यात सहा शेतकरी उत्पादक कंपनीकडून, तर पंधरा ठिकाणी वेगवेगळ्या सहकारी खरेदी संघांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

या २१ खरेदी केंद्रांवर चार लाख ५० हजार ७३२ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे चुकारेही वेळेत देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT