Sesame Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sesame Market : विदर्भात तिळाला क्विंटलला १३ हजार रुपयांचा दर

Sesame Market Update : यवतमाळ जिल्ह्यात भुईमूगाला पर्याय म्हणून तिळाची लागवड वाढली आहे. तिळाची काढणी आणि मळणीला वेग आले आहे.

Team Agrowon

Nagpur News : तिळाचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने बाजार समितीमधील आवक देखील सातत्याने कमी होत असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात भुईमूगाला पर्याय म्हणून तिळाची लागवड वाढली आहे. तिळाची काढणी आणि मळणीला वेग आले आहे. माल विक्रीसाठी बाजारात आणला जात आहे. सध्या तिळाचे व्यवहार १३ हजार रुपये क्‍विंटलने होत आहेत.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ या बाजार समित्यांमध्ये तिळाची आवक होत आहे. अमरावतीत गेल्या आठवडाभरापासून तिळाचे व्यवहार ११ हजार ५०० ते १२ हजार ५०० रुपयांनी झाले. अमरावती बाजारातील आवक ३० ते ३५ क्‍विंटलच्या घरात असल्याचे बाजार समिती सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यात देखील भुईमूगाला पर्याय म्हणून तिळाखालील क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे.

गेल्या हंगामात तिळाचे दर १३ हजार ते १३ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत होते. यंदाच्या हंगामात यवतमाळ बाजारातील तिळाला १२ हजार ६०० ते १३ हजार ४२५ रुपये क्विटंल असा दर मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात उत्पादित तिळाचा दर्जा तुलनेत चांगला असल्याने येथील तिळाला हे दर मिळत असल्याचे माहिती मिळाली.

सध्या या बाजार समितीमधील तिळाची आवक कमी होत रोज सरासरी २७ ते ३० क्‍विंटल इतकी राहिली आहे. येथील तिळाच्या खरेदीसाठी नागपुरातील व्यापारी येतात. दारव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून थेट खेडा खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. शेतकऱ्यांसाठी तीळ पिकाचा पर्याय आर्थिक सक्षमतेचे कारण ठरला आहे.

दारव्हा तालुक्यात २ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र

भुईमूगावर किडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याची उत्पादकता कमी झाली. त्याच कारणामुळे तिळाचा पर्याय निवडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात देखील भुईमूगाऐवजी तिळाला पसंती मिळत आहे. दारव्हा तालुक्‍यात तीळाखालील क्षेत्र २ हजार हेक्‍टरपर्यंत विस्तारल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT