Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean MSP Procurement : तेलंगणात १०० टक्के सोयाबीन खरेदी; राज्यात उद्दीष्ट सर्वाधिक, प्रत्यक्ष खरेदी मात्र सर्वात कमी

Soybean Market : केंद्र सरकारने महाराष्ट्रात सर्वाधिक १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट दिले. मात्र उद्दीष्टाच्या तुलनेत आतापर्यंत झालेली खरेदी महाराष्ट्रातच कमी आहे.

Anil Jadhao 

Pune News : केंद्र सरकारने महाराष्ट्रात सर्वाधिक १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट दिले. मात्र उद्दीष्टाच्या तुलनेत आतापर्यंत झालेली खरेदी महाराष्ट्रातच कमी आहे. तेलंगणाने खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण केले. तर मध्य प्रदेशने उद्दीष्टाच्या १९ टक्के खरेदी केली. मात्र महाराष्ट्रात केवळ १०.२६ टक्के खरेदी झाली. महाराष्ट्रात १७ डिसेंबरपर्यंत केवळ १ लाख ४५ हजार टन खरेदी करण्यात आली आहे.

नाफेडने दिलेल्या माहितीवरून हमीभावाने सोयाबीन खेरदी खूपच धिम्या गतीने सुरु असल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत देशभरात ५ लाख ५ हजार टनांची खरेदी झाली. तेलंगणात खेरदीचे उद्दीष्ट पूर्ण झाले. तर सर्वाधिक खरेदी मध्य प्रदेशात झाली. मध्य प्रदेशात २ लाख ५८ हजार तर महाराष्ट्रात केवळ १ लाख ४५ हजार टन सोयाबीन खरेदी केले. 

केंद्र सरकारने यंदा देशात ३३ लाख ६० हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यापैकी सर्वाधिक उद्दीष्ट महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात खरेदीचे १४ लाख १३ हजार टन उद्दीष्ट आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात १३ लाख ६८ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट आहे. म्हणजेच महाराष्ट्रात एकूण उद्दीष्टाच्या ४२ टक्के खरेदीचे उद्दीष्ट आहे. तर मध्य प्रदेशात एकूण उद्दीष्टाच्या तुलनेत जवळपास ४१ टक्के उद्दीष्ट देण्यात आले. म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये ८१ टक्के खरेदी केली जाणार आहे. 

देशभरात १७ डिसेंबरपर्यंत ५ लाख ५ हजार टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली. सर्वाधिक खरेदी मध्य प्रदेशात झाली. मध्य प्रदेशात आतापर्यंत २ लाख ५८ हजार टनांची खरेदी झाली. तर महाराष्ट्रात १ लाख ४५ हजार ८०३ टनांची खेरदी झाली. तेलंगणात ५९ हजार ५०१ टन खरेदी झाली. तर गुजरातमध्ये १७ हजार ३१६ टन खरेदी झाली. राजस्थानमध्ये १५ हजार ४९० टन आणि कर्नाटकात ९ हजार ११० टनांची आतापर्यंत खरेदी झाली. 

तेलंगणात उद्दीष्ट पूर्ण

तेलंगणात सोयाबीनचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे तेलंगणात केवळ ५९ हजार ५०८ टनांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १७ डिसेंबरपर्यंत तेलंगणात ५९ हजार ५०१ टनांची खरेदी पूर्ण झाली होती. म्हणजेच तेलंगणाने आपले उद्दीष्ट पूर्ण केले. 

राज्यात केवळ उद्दीष्टच जास्त

सोयाबीन खरेदीसाठी राज्यात सर्वाधिक उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. राज्यात १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट आहे. देशातील एकूण उद्दीष्टापैकी तब्बल ४२ टक्के खरेदीचे उद्दीष्ट महाराष्ट्रात ठेवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र राज्यात १ लाख ४५ हजार टनांचीच खरेदी झाली. म्हणजेच उद्दीष्टाच्या केवळ १०.२६ टक्केच खरेदी झाली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT