Agricultural Courses Agrowon
कृषी शिक्षण

ओबीसींसाठी नव्या ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तींना मान्यता

इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे, त्यांच्या पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.

Team Agrowon

राज्यातील इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नव्या ६४ व्यावसायिक (Vocational) , कृषी (Agriculture) अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत (Other Backward Bahujan Welfare Department) तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (Vocational Courses) शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे, त्यांच्या पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. तसेच संबंधित विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.

मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने इतर मागास बहुजन कल्याण विभाग (Other Backward Bahujan Welfare Department) सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी राज्यात एकूण ६०५ अभ्यासक्रम होते आता एकूण ७३६ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ अभ्यासक्रम नव्याने सुरु केल्याची माहितीही वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT