greenhouse effects 
कृषी शिक्षण

हरितगृह परिणाम म्हणजे काय..

सतीश कुलकर्णी

पर्यावरणाचा विषय आला की, हरितगृह वायू किंवा परिणाम यांचा उल्लेख होतो. हरितगृह परिणाम (ग्रीनहाउस इफेक्ट) हा शब्द कानावरून गेला नाही, असा माणूस भेटणे विरळा. केवळ नावावरून हवामानातील बदलासाठी हरितगृह किंवा पॉलिहाउस कारणीभूत असल्याचे समजणारे अनेक प्रौढही मला भेटले आहेत. त्यातील अनेकांचा हरितगृह शेतीमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असाच गैरसमज असे.

  • पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वायूमंडळांमुळे सूर्यप्रकाशातील उष्णता शोषली अथवा परावर्तित होते. त्यामुळे सूर्यकिरणांतील सजीव किंवा वनस्पतीच्या दृष्टीने हानिकारक असलेली किरणे रोखली जातात.  
  • जर हे वायूमंडळ पृथ्वीभोवती नसती तर पृथ्वी अधिक उष्ण राहून सजीवांना तग धरणे अवघड गेले असते. हे वायूमंडळ हरितगृहावरील विशिष्ठ काच किंवा प्लॅस्टिकच्या आवरणाप्रमाणेच कार्य करते. म्हणून या परिणामाला हरितगृह परिणाम असे म्हणतात.
  • पृथ्वीबाबत होणारा ग्रीनहाउस इफेक्ट

  • पृथ्वीभोवतीच्या वायूमंडळातील ओझोनचा थर सूर्यप्रकाशातील उष्णता आणि हानिकारक किरणांना शोषतो, रोखतो किंवा परावर्तित केली जातात. तरीही आतपर्यंत आलेल्या किरणांमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो.  
  • रात्रीच्या वेळी थंड वातावरणातील ही उष्णता हवेमध्ये फेकली जाते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडसारख्या काही हरितगृह वायूद्वारे यातील काही उष्णता रोखली जाते. परिणामी, पृथ्वीवरील वातावरण सरासरी१४ अंश सेल्सिअसने उष्ण राहते. एकूण पृथ्वी अतिथंड होण्यापासून वाचते.
  • संपर्कः सतीश कुलकर्णी, ९९२२४२१५४० (लेखक ॲग्रोवनचे वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

    Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

    Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

    Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

    Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

    SCROLL FOR NEXT